एक्स्प्लोर

हॉर्नबिलने एकनाथ खडसेंची झोप उडवली

आपल्या धारदार वक्तृत्त्वानं अनेकांना घाम फोडणाऱ्या एकनाथ खडसेंची झोपमोड करण्याची हिंमत कुणाची असेल..?

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची झोप सध्या रोज एक पाहुणा खराब करतोय. या पाहुण्यामुळं खडसेंना पहाटेच उठावं लागतंय. आपल्या धारदार वक्तृत्त्वानं अनेकांना घाम फोडणाऱ्या एकनाथ खडसेंची झोपमोड करण्याची हिंमत कुणाची असेल..? हा पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून एक हार्नबिल पक्षी आहे. रोज पहाटे हा ग्रे हॉर्नबिल म्हणजेच राखाडी धनेश पक्षी खडसेंच्या बेडरुमच्या खिडकीजवळ येतो आणि बंद असलेल्या खिडकीवर जोर जोरात आपली चोच आपटतो. या चोचेच्या आवाजामुळं खडसेंना पहाटेच उठावं लागतं. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचं फार्म हाऊस आहे. इथेच खडसे वास्तव्यास असतात. खडसेंच्या फार्म हाऊसमध्ये अनेक फळझाड आणि फुलझाडं आहेत. त्यामुळं अनेक पक्षी इथं येतात. काही दिवसांपूर्वी इथं एक हॉर्नबिलची जोडी वास्तव्यास आली आहे. हॉर्नबिलचा हा सहवास खडसेंना सध्या चांगलाच भावतोय. हॉर्नबिलचं आपल्या घर -परिसरात वावरणं आणि त्याने खिडकीच्या काचेवर चोच आपटून पहाटे लवकर उठवणं, आपल्यासाठी आनंददाई अनुभव असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. धनेश पक्षांच्या अनेक जातींपैकी महाराष्ट्रात आढळणारी ही जात. जोडीनं राहणाऱ्या या पक्षाचं राहणीमानही खूप सुंदर असतं. पण खडसेंच्या बेडरुमच्या काचेवर चोच आदळण्याचं कारणं नेमकं काय? खडसेंच्या बेडरुमची खिडकी पारदर्शी नाही, तर आरशासारखी आहे. ज्यामध्ये हा धनेश आपला चेहरा पाहतो..आणि कदाचित त्याला प्रतिस्पर्धी वाटल्यानं तो चोच आदळतो. हातनूर धरणामुळं मुक्ताईनगरच्या परिसरात निसर्ग जोपासला गेला आहे. इथं बिबट्यांसह इतर वन्यप्राण्याचं चांगलं वास्तव्य आहे. त्यामुळं आता खडसेंच्या प्रयत्नानं इथं एखादं अभयारण्य उभं राहिलं तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget