धुळे : ट्रक चालकांच्या मध्यरात्रीपासून सुरु होत असलेल्या देशव्यापी बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या वाहनातून संप संपेपर्यंत मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करत हा निर्णय घेतला आहे.
सर्व प्रकारच्या खाजगी वाहनातून, कंत्राटी आणि टप्पा वाहतूक करणाऱ्या बसेसमधून मालवाहतुकीस संप संपेपर्यंत परवानगी देण्यात येत असल्याबाबतची अधिसूचना गृह विभागातर्फे आज जारी करण्यात आली. ट्रक चालकांचा संप संपताच ही अधिसूचना रद्द होईल.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने आज मध्यरात्री पासून म्हणजेच 20 जुलैपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या संपाला मराठी कामगार सेनेनेही पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
ट्रक चालकांच्या मागण्या
डिझेल दरवाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवणे आणि त्यात बदल तिमाही असावा
टोलमुक्त भारत संकल्पना राबवावी.
थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवणे
आरटीओ, पोलीस आणि सीटीओ यांच्याकडून महामार्गावर होणारी छळवणूक थांबवावी
ट्रक चालकांचा संप, सर्व प्रकारच्या वाहनातून मालवाहतुकीला परवानगी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2018 07:11 PM (IST)
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करत हा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -