मुंबई :  कोरोनाची तिसऱ्या लाटेत मंत्री, आमदारांपाठोपाठ आता मंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झालाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी कोरोनाबाधित आढळलेत, तर छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 जणांना कोरोनाची बाधा झालीय. याशिवाय वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 


गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा आणखी मजबूत होत चालला आहे. सकाळी त्यांच्या कार्यालयात चार जणांना कोरोना झाल्याची माहिती आली होती मात्र आता ही संख्या वाढून तब्बल 21 वर पोहोचली आहे. तसंच आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे.  वळसे-पाटील यांच्या सचिवालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. स्वतः दिलीप वळसे पाटील हे मात्र या कर्मचाऱ्यांच्याा संपर्कात आले आहेत का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


राज्यात काल एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या: