Amravati News अमरावती : स्व.अंबादासपंत वैद्य बेवारस, दिव्यांग बालगृह वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर (Padmashri Shankar Baba Papalkar) यांना 9 मे रोजी भारत सरकारनी पदमश्री पुरस्कार देवुन गौरव केला. त्यावेळी दोन बेवारस दिव्यांग गांधारी दोन्ही डोळयांनी अंध आणि बहुविकलांग योगेश यांना सोबत घेवुन गेले होते. पदमश्री पुरस्कार समारंभ समाप्त् झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वत:हुन गांधारीकडे आले आणि तीचे दोन्ही हात धरुन विचारना केली. यावेळी त्यांनी गांधारी तुम कैसी हो, यह पदमश्री पुरस्कार समारंभ आपको कैसा लगा, तु ठिक है ना? आप मेरे घर मेरे साथ खाना खाने चलो असे म्हणत आपल्या घरी बोलावले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची ही आत्मीयता पाहुन राष्ट्रपती भवनातील  मंत्रीगण, अधिकारी वर्ग, पुरस्कार प्राप्त गणमान्य आणि आमंत्रीत प्रेक्षक वर्ग आश्चर्यचकित झाले होते.


पद्मश्री पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बेवारस दिव्यांग मुले


गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी 24 जुन रोजी स्पीडपोस्टाच्या माध्यमातून गांधारीच्या नावाने अभिनंदनस्पद पत्र आणि फोटोचे पार्सल आले. ही गोष्ट पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि  गांधारीला माहिती होताच त्यांना आनंद झाला. तसेच पद्मश्री पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बेवारस दिव्यांग मुले आली असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अमित शाह यांना यावेळी दिली होती. हेच लक्षात घेऊन त्यांनी गांधारीला आमंत्रण दिले होते.


कोण आहेत शंकरबाबा पापळकर?


अमरावतीच्या वझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य स्मृती बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांनी बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल शंकरबाबा पापळकर यांना 9 मे रोजी भारत सरकारनी पदमश्री पुरस्कार देवुन गौरव केला. अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांचा जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 1990 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात “स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह” नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.


शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु केलं. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे ते सांगतात, आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मूले आश्रमात होती. आश्रमातल्या 30 मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याची माहितीही  त्यांनी माहिती  शंकरबाबा पापळकर यांनी दिली. आतापर्यंत आश्रमातील 12 जणांहून अधिक लोक शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचेही ते सांगतात.


इतर महत्वाच्या बातम्या