Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 


1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण 211 एक्कर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ 1914 साली भाडेकरारावर देण्यात आली होती. 99 वर्षाचा हा करार 2013 साली संपुष्टात आला. 


आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा राज्य सरकार मार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता  देण्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर उर्वरित 91 एकर जागा  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर देण्यात येणार आहे. 


राज्य सरकारनं दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस साठी सुविधा करण्यात येणार आहेत अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


मुंबईकरांना मोकळा श्वास मिळणार : किशोरी पेडणेकर 


राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिकेला जमीन परत केली, त्याबद्दल धन्यवाद. गेल्या 10 वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू होता. रेसकोर्स कायम ठेवून उर्वरित जागेवर मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क उभारण्याची पालिकेची योजना आहे. या प्रकल्पासाठी परवानग्या येण्यास विलंब लागला, पण मुंबई महानगरपालिकेने त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळे या प्रकल्पासंबंधीचे काम वेगानं पुढे गेले, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.


पाहा व्हिडीओ : Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी