Holi 2023 Festival LIVE Updates: राज्यात होळीचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

Holi 2023 Festival LIVE Updates: देशासह राज्याच आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2023 02:21 PM
Kolhapur News: धुलीवंदनानिमित्त कोल्हापूरकरांचा मांसाहारावर ताव, मटण, मासे आणि चिकन घेण्यासाठी नागरिकांची तुंबड गर्दी.

Kolhapur News: धुलीवंदनचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो...धुलीवंदन म्हणजेच कोल्हापुरी भाषेत धुलवड आणि मांसाहार यांचं समीकरण ठरलेलं असतं.. आणि म्हणूनच कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नागरिकांची खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहेत...मटण घेण्याबरोबरच फिश आणि चिकन घेण्यासाठी देखील नागरिक सकाळपासूनच गर्दी करत आहेत.... कोल्हापूरकर आणि मांसाहाराचं नातं नव्याने सांगायला नको म्हणूनच आज प्रत्येक घराघरात खुळा रस्ता करत धुलवड साजरी केली जाणार आहे

Jalna News:  धुलीवंदनाच्या दिवशी प्रतिकात्मक हत्तीवरून बसून राजाकडून रेवड्या वाटप.

Jalna News:  जालना येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने  134 वर्षांची परंपरा असलेली 'हत्ती रिसाला' मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रतिकात्मक लोखंडी हत्तीची बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली जाते. या हत्तीवर वंश परंपरेने एका व्यक्तीला राजा म्हणून बसवले जाते. हा राजा याच हत्तीवर बसून लोकांना रेवड्या वाटतो. दरम्यान ही मिरवणूक ज्या भागातून जाते त्या ठिकाणी रंग खेळणे बंद करण्यात येत.  गेल्या 134 वर्षांपासून हा संकेत पाळला जातो. निझाम राजवटीपासून ही प्रथा रूढ झाल्याचा इतिहास  सांगितला जातो. 

Mumbai Holi: भाजप नेेते कृपाशंकर सिंह यांच्या होळी कार्यक्रमात मनोज तिवारींची उपस्थिती

Mumbai Holi: भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी सन अँड सन्स या जुहू चौपाटी परिसरात असणाऱ्या होटेल मध्ये होळीच आयोजन करण्यात आले. होळी कार्यक्रमात, मनोज तिवारींनी हजेरी लावली.   होळीनिमित्त गीत गायन करुन उपस्थितांची दाद लुटली. 

 Juhu Holi: मुंबईच्या जुहु चौपाटीवर धुळवड साजरी करण्यासाठी तरुणांची गर्दी

 Juhu Holi:  होळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा होताना पाहायला मिळत आहे.  मागील दोन-तीन वर्षात कोरोना निर्बंधामुळे होळी साजरी करता आली नव्हती. माञ यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत त्यामुळे जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात होळी साजरी करणाऱ्यांची संख्या पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात तरुण अनेक कुटुंब जुहू चौपाटीला होळी साजरी करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे 

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड केली साजरी

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. सहकुटुंब आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते... 

Holi 2023: आमदार बच्चू कडूंनी मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत घेतला धुळवडीचा आनंद

Holi 2023: आमदार बच्चू कडूंनी मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत  धुळवडीचा आनंद घेतला कुरळ पूर्णातील निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बच्चू कडूंसोबत  रंगांची उधळण केली

Vrindawan Holi:  विधवा आणि निराधार महिलांनी वृंदावनमध्ये खेळली होळी

Vrindawan Holi:  विधवा आणि निराधार महिलांनीही वृंदावनमध्ये खेळली होळी. गोपीनाथ मंदिरात  विधवांची होळी साजरी करण्यात आली. फुलं आणि गुलाल उधळत विधवांच्या आयुष्यात  रंग  भरले

Pune Holi: माजी मंत्री दत्ता भरणे यांना देखील होळी खेळण्याचा मोह, पुण्यातील तळजाई टेकडीवर  होळी खेळण्याचा आनंद लुटला

Pune Holi: आज राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय.  प्रत्येकजण आज रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद साजरा करतोय. अशातच माजी मंत्री दत्ता भरणे यांना देखील होळी खेळण्याचा मोह आवरला नाही.. आज मॉर्निंग वॉकला जाताना पुण्यातील तळजाई टेकडीवर  होळी खेळण्याचा आनंद लुटला

Juhu Holi: गुजराती समाजाकडून  जुहू येथे  धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन

Juhu Holi: गुजराती समाजाकडून  जुहू येथे  धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 

Juhu Holi: गुजराती समाजाकडून  जुहू येथे  धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन

Juhu Holi: गुजराती समाजाकडून  जुहू येथे  धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 

Ujjain Holi:  उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह

Ujjain Holi:  उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह दिसून आला.  देशभरातून भाविक होळीसाठी महाकालेश्वर मंदिरात येतात. होळीनिमित्त महाकालेश्वर मंदिरासाठी विशेष फुलांसह हर्बल गुलाल मागवला जातो. महाकालेश्वरला भांग आणि सुक्या मेव्याचा श्रृंगार केला जातो. 

Hingoli Holi: हिंगोलीच लैगी गीत गात बंजारा बांधवाची धुळवड साजरी

Hingoli Holi:  हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी बंजारा बांधवांनी सकाळीच होळी पेटवून होळीच्या सणाची सुरुवात केली आहे. गावातील सर्व बंजारा बांधव त्याचबरोबर महिला सुद्धा पारंपारिक वेशभूषामध्ये होळीचा सण साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत. लैगी गीत गाऊन बंजारा बांधव ही धुळवड या ठिकाणी साजरी करत आहेत

Mumbai Shivaji Park Holi:  शिवाजी पार्कमध्ये होळीचा उत्साह, ढोल वाजवत तरुणाईने केली रंगांची उधळण

Mumbai Shivaji Park Holi:   राज्यभरात धुळवड सर्वत्र साजरी केली जातीये यामध्ये दादरकर कुठेही मागे नाहीत.  शिवाजी पार्क परिसरात अगदी सकाळी सात वाजल्यापासूनच धुळवड अगदी उत्साहात साजरी केली जात आहे. ढोल वाजवत तरुणाई रंगांची उधळण करत आहे. शिवाजी पार्क मॅरेथॉन रनर ग्रुपने रोजच्या प्रमाणे धावण्याचा सराव केल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात धुळवड साजरी करण्याचं नियोजन केले आहे. 

Mumbai Holi 2023: अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स क्लब येथे सेलिब्रिटी धुळवडीचे आयोजन, कार्यक्रमाच तिकीट पन्नास हजार

Mumbai Holi 2023: अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स क्लब येथे सेलिब्रिटी धुळवड साजरी केली जाणार आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पन्नास हजारांपासून तिकीट आहेत

Holi 2023: आज राज्यसह देशभरात धुळवडीचा उत्साह

आज राज्यसह देशभरात धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे. धुळवडीची राज्यातल्या वेगवेगळ्या भागात वेगळवेगळी परंपरा दिसून येते... मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रंग खेळून धुळवड साजरी होते. कुठे फुलांची उधळण होते कुठे रंगांची उधळण होते.. तिकडे कोकणात आज शिमगोत्सवात देवाच्या पालख्या मंदिराबाहेर पडण्याची परंपरा आहे... मंदिराबाहेर देवाची साण म्हणजे बसण्याची जागा असते तिथे या पालख्या बसतात अनेक गावात तर धुळवडीच्या दिवशी देव भेटीचा सोहळा असतो..

विलेपार्ले पूर्व परिसरात 50 खोके, जनतेला धोके अशा आशयाचे खोके लिहून होळी साजरी

विलेपार्ले पूर्व परिसरात नवयुग मित्र मंडळाच्या वतीने महागाईचे 50 खोके, जनतेला धोके, पुढारी एकदम ओके या आशयाचे खोके लिहून होळी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शेकडो खोके आणण्यात आले असून मुंबई काँग्रेस महासचिव विष्णू सरोदे यांच्या हस्ते हे खोके दहन करण्यात येणार आहेत. सध्या सिलेंडरच्या दरात वाढीमुळे जनता त्रस्त आहे. यासोबतच गौतम अडाणी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक आहे. याच सर्व बाबी होळीसाठी ठेवण्यात आलेल्या खोक्यांवर लिहिण्यात आल्या आहेत. 

Nandurbar Holi: नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने होळीचा बाजार उडाला

नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. होळीनिमित्त आदिवासी बांधव होळीचा बाजार करण्यासाठी नवापूर विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा गावात मोठी गर्दी दिसून येत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने होळी बाजाराचा उडवल्याचे चित्र नवापूर शहरात दिसले असून व्यापारांची व ग्राहकांची चांगली धावपळ दिसले. साडेतीन वाजता सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना झाल्याने ग्राहक अर्धवट बाजार करून घरी निघून गेले.


नवापूर शहरात आशापुरी माते मंदिराजवळ होळीची पूजा करताना देखील महिलांना वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून, हवामान विभागाने  दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची  शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोबतच या पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

Chandrapur Holi: होळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीस प्रशासन अलर्टवर

Chandrapur Holi: होळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीस प्रशासन अलर्टवर आलंय. चंद्रपूर शहरातून पोलिसांनी रुट मार्च काढलाय. या पोलीस बंदोबस्तात 26 पोलीस निरीक्षक, 100 पोलीस उपनिरीक्षक, 1000 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड आणि 100 वाहतूक पोलीस यासह राखीव पोलीस दलाच्या दोन चमू आणि वेगवेगळी दहा पथकं जिल्हाभर तैनात असणार आहेत..

Holi 2023: उत्तर भारतीय संघाच्यावतीने धुळवड साजरी करण्यासाठी खास तयारी

Holi 2023:  ग्रामीण भागातील होळीचं वातावरण मुंबईसारख्या शहरात राहाणाऱ्या उत्तर भारतीयांना अनुभवता यावा. यासाठी उत्तर भारतीय संघाच्या वतीने धुळवड साजरी करण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. यानिमित्त ग्रामीण भागातील वातावरणात होळी खेळता यावी यासाठी ग्रामीण भागातील देखावा उभारण्यात आलाय.

Mumbai News:  आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीतल्या कोळीवाड्याला भेट

Mumbai News:  आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीतल्या कोळीवाड्याला भेट दिली.  आदित्य ठाकरेंनी स्थानिक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.   वरळी कोळीवाड्यात होळी मोठया उत्साहात साजरी केली जाते आणि प्रत्येक चौकात होळी पेटवली जाते. आदित्य ठाकरे कोळीवाड्यातील अरुंद गल्ल्यांमध्ये फिरले.  स्थानिक आमदार असल्याने आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.. वरळीत  अनेक कोळी बांधवांनी ठेका धरला 

Purandar Holi: पुरंदरच्या वाल्हेमध्ये विद्यार्थ्यांची अनोखी होळी

Purandar Holi: पुरंदरच्या वाल्हेमध्ये विद्यार्थ्यांकडून विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता करुन होळी. महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखी होळी.  क्रोध, मत्सर, भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेद, निरक्षरतेचे दुर्गुणरूपी फलक हातात घेऊन होळीसभोवती फेरी मारली. 

Purandar Holi: पुरंदरच्या वाल्हेमध्ये विद्यार्थ्यांची अनोखी होळी

Purandar Holi: पुरंदरच्या वाल्हेमध्ये विद्यार्थ्यांकडून विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता करुन होळी. महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखी होळी.  क्रोध, मत्सर, भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेद, निरक्षरतेचे दुर्गुणरूपी फलक हातात घेऊन होळीसभोवती फेरी मारली. 

Buldhana News: आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह

Buldhana News:  देशभरात सध्या होळीचा उत्साह टिपेला पोहोचलाय. देशभरातील आदिवासींसाठी होळी हा प्रमुख उत्सवांपैकी एक. राज्यातील आदिवासी भागात हाच उत्साह पहायला मिळतोये. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये रात्री फेर धरून नृत्य करीत लोक होळीचाआनंद साजरा करतायेत. पारंपारिक कोरकू नृत्य करीत आदिवासी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देता येत.

 Shirdi Holi:  साईबाबा मंदिरात होळी उत्सव साजरा

 Shirdi Holi:  शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळीचे पुजन करून होळीचे दहन करण्यात आले. साईबाबांच्या गुरूस्थान मंदिरासमोर संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचे हस्ते  होळीचे विधीवत पुजन करण्यात आले. अपप्रवृत्तीचा नाश होवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मध्यान्ह आरती अगोदर होळीची पुजा करून होळी पेटवण्यात आली त्यानंतर साईबाबांना होळी सणाचे महत्व लक्षात घेऊन पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर साई मुर्तीला साखरेच्या गाठींची माळ परिधान करण्यात आली होती. तर सायंकाळी द्वारकामाई मंदिरासमोर साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने मानाची होळी पेटवण्यात येते त्यानंतर घरोघरी होळीचे दहन करण्यात येते....

Bhandara News: लुप्त होत चाललेल्या घानमाकडवर ग्रामस्थांनी लुटला आनंद, भंडाऱ्यात हौशी मंडळींनी घेतला पुढाकार

Bhandara News:  होळीनिमित्त शिमगोत्सव सुरु झाला आहे. या होळीत 'घनमाकड' ला विशेष महत्व असायचे, मात्र आधुनिकतेत ही घानमाकड लुप्त होत असल्याचं चित्र सर्वदूर बघायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी मुलं विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यात दंग असल्याचं बघायला मिळत होती. मात्र, आता सर्व खेळ बाजूला सारून प्रत्येकांच्या हातात आता मोबाईल दिसतोय. कुठलाही फारसा खर्च नसलेला मात्र धम्माल मस्ती आणि आनंद देणारा हा खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय असला तरी बदलत्या काळात तो लुप्त होऊ लागला आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील बऱ्हडकिन्ही - किटाळी येथील काही हौशी मंडळींनी सिद्ध साक्षी आनंद आश्रमात या खेळाची परंपरा जोपासण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या घानमाकडवर गावातील बालगोपाल आणि ग्रामस्थांनी बसून गोल गोल फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Parbhani News:  परभणीच्या बंजारा तांड्यावर होळीचा उत्साह

Parbhani News:  आज सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळतोय त्यात प्रामुख्याने बंजारा समाजात होळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे.परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अंबरवाडी,हलविरा,जांब आदी तांड्यावर आज होळी उत्सवाला  सुरुवात झाली असुन या तांड्यावरिल सर्व महिलांनी बंजारा पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेंगी नृत्य केले यावेळी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनीही या उत्सवात सहभागी होत बंजारा पारंपरिक वेशभूषा परिधान केली शिवाय लेंगी नृत्य ही केले आहे..

 Holi 2023 :होळीसाठी बाजारपेठा सजल्या

 Holi :  होळी सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. आदिवासी समाजात होळीच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे. सातपुड्यात पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जात असतो पारंपारिक वेशभूषा पारंपारिक ढोल यांचा आवाज आणि होळीच विशेष असलं तरी यात साखरेचा पाका पासून बनविलेला हार आणि कागण यांचे महत्व आहे. नंदुरबार मध्ये हलवाई परिवार होळी साठी लागणारे हार आणि कांगण बनवितात त्यांनी बनविलेल्या ह्या वस्तू होळी पूजनाला लागतात या वर्षी साखरेचं दर वाढल्याने हार कंगणचे दर 20 ते 25 टक्केने वाढले आहेत. होळीचा काळात नंदुरबारच्या हलवाई वाड्यात लगबग आसते ती साखरे पासून होळी साठी लागणाऱ्या होळीच्या वस्तू बनविण्याची हजारो कारागीर ह्या वस्तू बनवितात त्यासाठी दिवस रात्र काम चालत आसते साखरेचा पाक बनवून तो लाकडी साच्यात टाकला जातो त्या नंतर वस्तु तयार केल्या जातात. त्यासोबत धुलीवंदनासाठी देखील बाजारपेठा फुलले आहेत धुलीवंदनाच्या दिवशी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत एकमेकांना रंग लावून आणि पिचकारीतून पाणी उडवून धुलीवंदन साजरा केली जात असते यासाठी बाजारपेठ सज्ज झाले आहेत.

Buldhana Holi:  होळीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर सैलानी येथे सैलानी बाबांचा संदल

Buldhana Holi:  होळीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर सैलानी येथे सैलानी बाबांचा संदल असतो. सर्वधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या सैलानी दर्गा येथे होळीच्या दिवशी देशभरातून दोन ते तीन लाख भाविक जमतात.

Melghat Holi: मेळघाटात आदिवासी बांधव आपल्या परंपरेनुसार होळी साजरी करणार

Melghat Holi: आज मेळघाटात आदिवासी बांधव आपल्या परंपरेनुसार होळी साजरी करणार आहेत. वर्षातून एकदा येणारा या सणाला मोठया प्रमाणात लोकांची गर्दी असते

पार्श्वभूमी

आज देशभरात होळीचा उत्साह आहे... आणि कोकणात हा शिमग्याचा उत्साह आठवडाभर आधीपासूनच असतो...कोकणातही पहायला मिळणार पारंपारीक होळी. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे सामाजिक महत्त्व म्हटले जाते. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. असे मानले जाते की या दिवशी लोकांमधील आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद दूर होतात


महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून लाकडं मंत्रोच्चारात जाळतात येतात, पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची राख अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.


शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व


भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.


होळीचा पौराणिक कथेशी संबंध


होळीबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. पण भक्त प्रल्हादाची कथा त्याच्या आरंभी सापडते. असे मानले जाते की प्राचीन काळी हिरण्यकशिपू नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस राजा होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा इतका अभिमान होता की तो स्वतःला देव मानू लागला. एवढेच नाही तर त्याने सर्व लोकांना त्याची पूजा करण्याचा आदेश दिला. यासोबतच त्याने एक आदेशही जारी केला की जर कोणी त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा केली तर त्याला मृत्युदंड देण्यात येईल. राक्षस राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. त्याची भक्ती इतकी दृढ होती की वडिलांनी वारंवार नकार देऊनही तो हरिभक्तीत तल्लीन राहिला. हिरण्यकशिपूच्या समजूतीनंतरही प्रल्हादने ऐकले नाही, तेव्हा पिता राजाने वेगळी योजना आखली आणि बहीण होलिकाला राजवाड्यात पोहोचण्याचा निरोप दिला. भाऊ हिरण्यकश्यपूचा निरोप मिळताच होलिका तिथे पोहोचली. तिथे गेल्यावर तिला कळलं की आपल्याला भाच्यासोबत आगीमध्ये बसावं लागणार आहे. कारण होलिका वरदान लाभले होते की आग तिला कधीही स्पर्श करू शकत नाही. जरी सुरुवातीला तिला हे मान्य नव्हते, परंतु बराच काळ ती हिरण्यकशिपूची आज्ञा टाळू शकली नाही. दुसर्‍याच दिवशी ती आपला पुतण्या प्रल्हाद याला कुशीत घेऊन अग्नीत बसली.


..येथूनच होळीचा सण सुरू झाला


होळीनिमित्त आख्यायिका आहे की, होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली होती, तेव्हाही प्रल्हाद श्री हरी नामाचा जप करत होती. थोड्याच वेळात होलिका पूर्णपणे जळून गेली आणि प्रल्हाद सुखरूप वाचला. येथूनच होळीचा सण सुरू झाला आणि हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाऊ लागला.


ग्रामीण भागातील होळीचं वातावरण मुंबईसारख्या शहरात राहाणाऱ्या उत्तर भारतीयांना अनुभवता यावा. यासाठी उत्तर भारतीय संघाच्या वतीने धुळवड साजरी करण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. यानिमित्त ग्रामीण भागातील वातावरणात होळी खेळता यावी यासाठी ग्रामीण भागातील देखावा उभारण्यात आलाय

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.