NCP News : स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका वेळेत घ्या, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) याचिका दाखल करणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. 


शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. असे असताना देखील उशीर करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात येणार आहेत.


1) कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार उशीर करतं आहे. कोर्टाने मागील महिन्यात 15 दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात येतं असल्यामुळे कोर्टाचा अवमान झाला असल्याचे प्रशांत जगताप यांचे म्हणणं आहे.


2) पुण्यात महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यी प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तो बदलून शिंदे-फडणवीस सरकारने 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. 80 टक्के निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तीन सदस्यीय रचनाही अंतिम झाली आहे. तरी भाजपने आपल्या फायद्यासाठी आता चार सदस्यीय रचना तयार केली आहे. आगामी निवडणुकीसाठीची सगळी कामे झाली असताना हा निर्णय घेऊन उगाच वेळ घालवला जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे.


नव्या सरकारचा प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय 


एकीकडे राज्यात  रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना प्रत्यक्षात मात्र निवडणुका लांबणीवर पडण्याचीच चिन्हं आहेत. नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणविस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय रद्द करत नव्या सरकारनं पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महापालिका, नगरपरिषदांमध्ये तसेच महापालिकेत महापौर नाही, नगरसेवक नाहीत. अनेक महापालिकांची मुदत उलटून अनेक महिने झालेत. पण सगळा कारभार  प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळे, शहरातल्या नागरी समस्या सोडवण्या करता तातडीनं निवडणूका हव्यातच. पण पुन्हा एकदा महापालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येमार आहे.   


महत्त्वाच्या बातम्या: