Hingoli News Update : हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hingoli District Hospital ) परिचारिका (Nurse) म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचा सिझेरियन प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. संध्या मोरे असे या मृत्यू झालेल्या परिचारिकेचे नाव असून ती हिंगोली शहरातील अजम कॉलनीमधील रहिवाशी आहे.
मृत महिलेची हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रस्तुती झाली. यामध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु, प्रसूतीनंतर तिची तब्येत खालावल्याने पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालयात दाखल केले. विष्णुपुरी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
संध्या मोरे या महिलेच्या मृत्यूमुळे मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पूर्वी सुद्धा सहा महिन्यापूर्वी 14 नोव्हेंबर 2021 रोजी ज्योती गवळी नावाच्या परिचारिकेचा सिझेरियन प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.आता संध्या हिच्या मृत्यूमुळे परिचारेकेचा मृत्यू होण्याची सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
अनेक महिलांची सुखरूप प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचाच दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आक्षेप घेतला आहे. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या