Amit Thackeray Bless With Baby Boy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी आनंदाची बातमी आहे. राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ठाकरे घराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 


आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले आहेत. नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतंय. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


कोण आहेत अमित ठाकरे यांच्या पत्नी?


27 जानेवारी 2019 रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha