हिंगोली : भूगर्भातील जमिनीचा अभ्यास करणारी आणि अमेरिका युरोप, जपाननंतर भारतामध्ये उभारल्या जाणाऱ्या चौथ्या महत्त्वकांक्षी लिगो संशोधन केंद्रासाठी लागणारी सर्व जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  या प्रकल्पासाठी 225 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये जगातील चौथे सर्वात मोठे संशोधन केंद्र आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये दुधाळा अंजनवाडा शेत शिवारामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  जमिनीतील भूगर्भाची अभ्यास करणारी आणि अमेरिकेतील नासा या संशोधन केंद्राचे थेट संपर्क असलेली जगातील चौथ्या क्रमांकाची अद्यायावत आणि भारतातील पहिली सर्वात मोठी अद्ययावत संशोधन केंद्र हे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात उभारण्यात येत आहे. या संशोधन केंद्रामध्ये भूगर्भातील लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. 


या संशोधन केंद्रासाठी एकूण दोनशे पंचवीस हेक्टर जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमीन त्याच बरोबर शासकीय असलेली जमीन आणि वनविभागाच्या अखत्यारीत असलेली काही जमीन या जमिनीचा समावेश आहे. या शेत जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांची खाजगी शेतीचे आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना शासकीय दरानुसार सर्व प्रक्रिया करून मोबदला सुद्धा देण्यात आला आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.


कोरोनामुळे जमिनी हस्तांतरणाचा काम हे ठप्प पडलं होतं. आता सर्व काही सुरळीत झाल्याने संशोधन केंद्राच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. 
हे संशोधन केंद्र म्हणजे भारतवासीयांना अभिमान वाटावा आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचणार संशोधन केंद्र असल्याचं वैज्ञानिकांच्या वतीने सांगितले जात आहे. 


गेल्या दोन वर्षापासून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामकाज ठप्प होतं जवळपास बाराशे कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनामुळे ठप्प पडलेला होता. त्यानंतर कोरोनाची लाट कमी झाली आणि आता या प्रकल्पाची सुरुवात पुन्हा नव्याने उम्मेदिने करण्यात आली आहे.


जमिनीतील गुरुत्वीय लहरी आणि ब्रह्मांडातील होणाऱ्या वेगवेगळ्या लहरींचा अभ्यास करणार हे संशोधन केंद्र असणार आहे वातावरणाच्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेगळे वेदर स्टेशन बसवण्यात येणार आहे. या माध्यमातून वाहते वारे हवामान तापमानातील बदल पाऊस यासह अनेक विषयांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून हे संशोधन केंद्र जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष वेधून राहिलेल आहे.