हिंगोली : राज्यांमध्ये आज एकूण 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी सुद्धा मतदार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु औंढा नागनाथ शहरांमधील बूथ क्रमांक पाचवर अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांचा अंगरक्षक त्याच बरोबर अन्य 13 जणांच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ त्याचबरोबर सेनगाव नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचारापर्यंत सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. जिल्ह्यामधील राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे शिवसेना आमदार संतोष बांगर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या चारही आमदारांनी दोन नगरपंचायत मधील प्रत्येक नागरिकाला भेट देऊन प्रचार पूर्ण केला  या दोनही नगरपंचायत मध्ये राजकीय रित्या चौरंगी लढत दिसून आली आज सकाळपासूनच या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. प्रत्येक उमेदवारांच्या भेटी घेऊन निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर हे औंढा नागनाथ शहरामध्ये आले या ठिकाणी त्यांनी सर्व उमेदवारांची भेट घेऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक पाचवर असलेल्या मतदान केंद्रावर कोणतीही परवानगी नसताना भगवे रुमाल गळ्यात घालून स्वतःच्या अंगरक्षकासह अन्य तेरा कार्यकर्त्यांना घेऊन या मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला. अशा पद्धतीने त्यांना मतदान केंद्रात प्रवेश करण्यास परवानगी नसताना सुद्धा त्यांनी या मतदान केंद्रात प्रवेश केल्याने त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसात आमदार संतोष बांगर यांचा अंगरक्षक आणि अन्य तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत बघता शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पार्श्वभूमी ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे अनेक वेळा त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत  आणि आता आमदार महोदयांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर सुद्धा या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे देशांमध्ये लोकशाही असताना सत्ताधारी पक्षातील आमदार अशा पद्धतीने नियमाला धाब्यावर बसून मतदान केंद्रावर प्रवेश करतात हे लोकशाहीला घातक आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :