मुंबई  : जगभरातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 11 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आठ रुग्ण मुंबई विमानतळावर झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये तर प्रत्येकी एक रुग्ण हा उस्मानाबाद, नवी मुंबईतील आणि पिंपरी चिंचवड येथील  आहे. आतापर्यंत राज्यात  ओमायक्रॉनच्या 65 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 34 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


मुंबई विमानतळावर सापडलेल्या आठ रुग्णांपैकी प्रत्येकी एक रुग्ण हा केरळ, गुजरात आणि ठाणे येथील आहेत. तर इतर रुग्ण हे मुंबईतील आहेत. 


दिल्लीत ओमायक्रॉनचे 20 नवे रुग्ण
सोमवारी केवळ दिल्लीमध्ये 20 हून अधिक नवे ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 20 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीतील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 54 झाली आहे. 


देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 200 वर
देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहायला मिळतोय. दिल्लीत सोमवारी दिवसभरात ओमायक्रॉनचे 24 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत रविवारीही आठ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे दिल्लीतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 54 झाली आहे. तर महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडाही 65 वर गेला आहे.


राज्यात कोरोनाचे 825 नवे रुग्ण
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज   825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 792  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 807 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 


संबंधित बातम्या :