Ravindra Waikar : प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर ईडीने महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एक नेता ईडीच्या चौकश्याच्या फेऱ्यात अडकला आहे. शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वायकर यांची  चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून केंद्राची चांगलीच वक्रदृष्टी पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. 


शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ईडीने समन्स बजावल्याचं समजतेय. त्यानुसार, वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहले होते. मंगळवारी वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी झाली. या चौकशीमधून नेमकं कोणती माहिती समोर आली हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वायकर यांच्या चौकशीबाबत गुप्तता बाळगणे्यात आली होती. कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण वायकर यांच्या चौकशीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 


आतापर्यंत कोणत्या नेत्यांवर कारवाई
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावत महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केले. त्या नेत्यांवर नंतर ED आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. त्यानंतर अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. तसेच अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांवर आरोप झाले. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live