Hingoli Hospital Bed:हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर त्यांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने प्रशासन हललं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानंतर या प्रकरणाची वेगवेगळ्या स्तरांवर दखल घेतली गेली आहे.  मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सचिवांना तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी रात्री बाळापूर ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली तसेच डॉक्टर, जिल्हा चिकित्सक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. डॉ. रामटेके यांनी सांगितले की, तपास अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार असून त्यावरून पुढील कारवाई केली जाईल.


हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलांना रूग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने भर थंडीत जमिनीवरती झोपवल्याची वेळ आली आहे.तर हे प्रकरण समोर आल्यानंतर आता त्या रूग्णालयातील बेडची क्षमता वाढवली आहे, अशी माहिती समोर आली आहे. 


बेडची संख्या वाढवली


प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने कृती सुरू केली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयातील 20 नवीन बेड वाढवण्याचे आदेश दिले. हे बेड हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयातून ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. सध्या ग्रामीण रुग्णालयातील 30 आधीचे बेड आणि 20 नव्याने आलेले बेड मिळून एकूण 50 बेडची क्षमता झाली आहे. या घटनेत 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्यात आले होते, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. एबीपी माझाच्या वृत्तामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची उदासीनता समोर आली, ज्यामुळे प्रशासनाला तातडीने सुधारणा करावी लागली.


संबधित घटनेची चौकशी होईल


महिलांना झोपण्याची सुविधा केली तो वॉर्ड नवीन आहे. तिथे स्वच्छता ठेवण्यात आलेली होती. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आलेली होती. त्याचबरोबर शौचालयाची देखील स्वच्छता होती. या घटनेनंतर आता बेडची संख्या वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सचिवांना तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी रात्री बाळापूर ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली तसेच डॉक्टर, जिल्हा चिकित्सक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. डॉ. रामटेके यांनी सांगितले की, तपास अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार असून त्यावरून पुढील कारवाई केली जाईल. असेही रामटेके यांनी सांगितले.


संबंधित बातमी:


Hingoli News: 'एबीपी'च्या बातमीचा दणका! बाळापूर ग्रामीण रूग्णालयातील कॉटची संख्या वाढवली; बेडअभावी 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर झोपवलेलं जमिनीवर