Bhalchandra Nemade Majha katta : साने गुरुजींना शामची आई या लिखाणासाठी नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे होतं असे मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर वि का राजवा़डे यांच्या लिखाणालाही मिळायला हवे. समकालीन मध्ये अरुण कोल्हाटकर यांना मिळायला हवं. युरोपातील माणसांपेक्षा अनेक मोठे साहित्यिक आपल्याकडे आहेत. पण त्यांना नोबेल मिळालं नाही असे नेमाडे म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. 


सुरुवातीला कोसला कादंबरीच्या विरोधात अनेकांनी लिखाण केलं


मी कोसला ही कादंबरी ठरवून लिहली असल्याचे भालचंद्र नेमाडे म्हणाले. लोकांना आवडेल असे लिहायचटं तर काय लिहायचं असा विचार करत होतो. मग आपला आयुष्यच लहानपणापासून लिहायचं ठरवल्याचे नेमाडे म्हणाले. लहानपणी काय काय गमती जमती केल्या त्याच्या सर्व नोट्स काढल्याचे नेमाडे म्हणाले. त्यानंतर कॉलेजचे दिवस हे सगळं त्यामध्ये लिहल्याचे नेमाडे म्हणाले. प्रकाशकाला लेखन आवडल, त्यानंतर लगेच पुस्तक छापायला दिल्याचे नेमाडे म्हणाले. त्यावेळी सुरुवातीला माझ्या कोसला कादंबरीच्या विरोधात बरेच लिखाण केल्याचेही नेमाडे म्हणाले. मात्र, तरुण पिढीनं माझी कोसला कादंबरी उचलून धरल्याचे नेमाडे म्हणाले. आपलं लोक वाचतात याचा मला अभिमान वाटतो, यातून प्रेरणा मिळते असेही भालचंद्र नेमाडे म्हणाले. मी आत्तापर्यंत 200 च्या वर मुलाखती आहेत. त्यातल्या काही मुलाखतींचे एक पुस्तक काढत आहेत असे नेमाडे म्हणाले. 2025 मध्ये माझी सहा पुस्तके येतील असे भालचंद्र नेमाडे म्हणाले. पुढचं 


पेपर जरी वाचत नसलो तरी मी चांगली मासिकं वाचतो


पेपर जरी वाचत नसलो तरी मी चांगली मासिकं वाचत असतो. पुस्तके वाचत असतो, एकत असतो, नेमकं काय चाललंय? त्यावरुन लक्षात येतं की जे चाललंय ते बरोबर चाललं नाही असे नेमाडे म्हणाले. हे कशामुळं होत असेल? कोणामुळं होतं असेल? याचा विचार मतदान करताना करत असल्याचे नेमाडे म्हणाले. भाषेच्या मुद्यावरुन देखील नेमाडे यांनी वरक्तव्य केलं. मराठी शाळा चांगल्या करा, सध्या मराठी शाळा बंद होत असल्याचेही नेमाडे म्हणाले. हल्ली मुलं आपल्या मातृभाषेत बोलत नाहीत असंही नेमाडे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका