एक्स्प्लोर

आरजू आणि विशालच्या लग्नाची गोष्ट, ज्यांनी धर्माची भिंत अलगद दूर केली

पुणे: आंतरधर्मीय लग्न आपल्याकडे अगदीच नवीन नसली, तरी ती नेहमीची नाहीत हेही खरं. त्यातही ते लग्न जर हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं असेल तर त्याची चर्चा होतेच.. पुण्याच्या विश्रांतवाडी भागात आज एक असंच लग्न संपन्न झालं. विशाल पोखरकर आणि आरजू तांबोळी यांनी धर्मांच्या भिंती अलगद दूर केल्या.   आपल्या आजूबाजूला जिथे आंतरजातीय लग्न हाच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि कपाळावर आठ्या आणतो, तिथं आंतरधर्मीय लग्नाचं स्वागत होईल अशी अपेक्षाच न केलेली बरी. जात पंचायतीनं आंतरजातीय लग्न केलेल्यांना वाळीत टाकणं, शिक्षा सुनावणं अशा दुर्दैवी गोष्टीही अवती-भोवती नियमित घडत असतात. पण पुण्यात झालेलं विशाल पोखरकर आणि आरजू तांबोळी यांचं लग्न मात्र या निराशेच्या वातावरणात दिलासा देणारं ठरलं. विशाल हिंदू... आरजू मुस्लीम... पण नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या दोघांनीही नोंदणी पद्धतीनं लग्न केलं.   लग्न म्हटलं की वधूवर आणि त्यांचे आई- वडील यांच्या इतकेच किंवा कदाचित जास्तच नातेवाईकही त्या निर्णयप्रक्रीयेचा भाग असतात. यांच्याबाबतीतही चित्र वेगळं नव्हतं.. मुलगा चांगला असावा एवढी एकच अपेक्षा आरजूच्या आईनं ठेवली असली, तरी आपल्या मुलीनं हिंदू मुलाशी लग्न ठरवलंय, हे नातेवाईकांना समजावणं तिच्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. म्हणूनच आरजूच्या लग्नाचा आनंद असला तरी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या सासरच्यांनी या लग्नाला येऊ दिलं नाही, त्याचं दुःखही या आईला आहे.   आरजू आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यानंतर तिनं एमपीएससीची परिक्षा दिली. आता ती सेल्सटॅक्स ऑफिसर म्हणून काम करते. विशाल पुण्यात पत्रकारिता करतो. आरजूच्या आईला ऐकावा लागला तेवढा विरोध विशालच्या घरच्यांना मात्र नाही. कुठलाही धर्म आणि कुठलीही जात ही एकच आहे असं विशालचे वडील म्हणतात तेव्हा त्यांच्या समजुतदारपणाचं म्हणूनच कौतुक वाटतं.   अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन मिश्र विवाह संस्था आणि मुस्लीम सत्यशोधक समाजानं विशाल आणि आरजूला या प्रवासात साथसोबत केली. बाबा आढाव, हमीद दाभोलकर, अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी, रझिया पटेल या सगळ्यांनी या लग्नाला उपस्थित राहात विशाल आणि आरजूला शुभेच्छा दिल्या.   हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं सहजीवन हे आपल्या देशात अनेक वर्ष चालत आलं आहे. पण हिंदू आणि मुस्लीम युवकांनी आपला सहचर समोरच्या धर्मात शोधण्याला मात्र म्हणावी तशी प्रेरणा आपल्या समाजात नाही. पण असं असलं तरी प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीला झालेला आरजू आणि विशालचा थाटामाटात विवाह, हे समाज बदलाच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला रकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget