मुंबई : देवदेवतांच्या नावांचं इंग्रजीकरण करताना ती हास्यास्पद ठरु नयेत, यासाठी हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे. देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू देवतांची नावं योग्य पद्धतीने शिकवण्याची मागणी केली जात आहे.

इंग्रजी शाळांतील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू देवतांची नावं लिहिताना विचित्र पद्धतीने लिहिल्याचा आरोप केला आहे. हनुमानाचा उल्लेख 'Monkey God' असा केला जातो, तर गणपतीचा उल्लेख 'Elephant God' असा केल्याचं हिंदू जनजागृती समितीने म्हटलं आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे यांना पत्र लिहिलं आहे. हिंदू देवतांचं नामकरण इंग्रजीत करताना विद्यार्थ्यांमध्ये थट्टेचा विषय ठरतो, असा दावा त्यांनी केला आहे.

इतर धर्मीयांच्या देवदेवतांची नावं जर आहेत तशाच पद्धतीने लिहिली जातात, तर हिंदू देवदेवतांच्या बाबतीतच नावांच्या भाषांतराचा अट्टाहास का केला जातो, असा सवाल हिंदू जनजागृती समितीने केला आहे.