कोल्हापूर: करवीरनिवासिनी अंबाबाईला आज हापूस आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिलं शक्तिपीठ असलेल्या अंबाबाईची दररोज वेगवेगळ्या रुपात आकर्षक पूजा मांडण्यात येते.
सध्या उन्हाळ्याचा आणि हापूस आंब्याचा मोसम सुरु असल्यानं देवीची आंब्याच्या वनात विराजमान झालेली पूजा बांधण्यात आली. तसंच देवीला हापूस आंब्याचा नैवेद्यही दाखवण्यात आला. देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
नवरात्रीत ज्याप्रमाणे देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा बांधली जाते त्याचप्रमाणे आज आंब्याच्या वनात विराजमान झालेली पूजा बांधण्यात आली. नवरात्रीत नऊ दिवस अंबाबाईची वेगवेगळ्या रुपातील पूजा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आजही भाविकांना वेगळ्या रुपातील पूजा पाहायला मिळाली.