Mumbai: त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्तीवरून राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असताना रविवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द् केले. आणि आता डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक नवी समिती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. आता यावरूनच साहित्य क्षेत्रात नवा वाद उफाळला आहे.डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात त्रिभाषा धोरणासंदर्भात समिती स्थापन करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला साहित्य क्षेत्रातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाद भालचंद्र यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला असून नरेंद्र जाधव हे भाषातज्ञ आहे का ? असा प्रश्न उपस्थित केलाय.
साहित्यक्षेत्रातून डॉ नरेंद्र जाधव यांच्या नावाला विरोध
डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात त्रिभाषा धोरणासंदर्भात समिती स्थापन करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला साहित्य क्षेत्रातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाद भालचंद्र यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला असून नरेंद्र जाधव हे भाषातज्ञ आहे का ? असा प्रश्न उपस्थित केलाय. हिंदी सक्ती व त्रिभाषा धोरणाचे शासन आदेश रद्द केले आहे तर समितीची गरज कशाला ? सरकारने त्रिभाषा व हिंदी सक्तीचा भूमिका पूर्णता सोडली असे नसल्याचे दिसत असल्याचे श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले.
डॉ माशेलकर समिती ही उच्च व तंत्रशिक्षण विभागाची होती, त्याचा शालेय शिक्षण विभागाशी काय संबंध ? असे म्हणत नवीन समितीला घेवून आपण मुख्यमंत्रांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. समितीवर कोण सदस्य असावे हे देखील पात्रातून कळवल्याचं ते म्हणाले .
डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, याविषयावर चुकीच्या पध्दतीनं राजकारण होत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगोपांग चचर्च केली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशाप्रकारे करावी,मुलांना काय निवड द्यावी याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात येईल.
या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल. म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी समिती त्रिभाषा सूत्रासंदर्भात सर्व गोष्टींचा अभ्यास करेल अशी घोषणाही त्यांनी केली.
कोण आहेत डॉ नरेंद्र जाधव?
डॉ नरेंद्र दामोदर जाधव हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर सामाजित विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये त्यांनी लेखन केलं आहे. या तीन भाषांमध्ये डॉ नरेंद्र जाधव यांनी 37 पुस्तके लिहिली आहेत. यात मराठीत 13,इंग्रजीत 19 व हिंदीमध्ये 3 पुस्तके लिहिली आहेत. तसेच 300 पेक्षाही अधिक शोधपत्र आणि लेख लिहिले आहेत.
हेही वाचा