Nagpur News : दुकान रिकामे करण्याच्या बदल्यात हप्तावसुली करत 14 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढणाऱ्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेला हारिस आरिफ रंगुनवाला आणि त्याचा भाऊ झैनविरोधात पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. या दोघांनीही एका रेस्टॉरंट चालकाची फसवणूक करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली.


बोरगाव येथील रहिवासी अर्शद डल्ला (वय 37) यांनी त्याचा मित्र तुशाद जाल याच्यासोबत सदर येथील जाल कॉम्प्लेक्समध्ये 2017 साली रेस्टॉरंट सुरु केले होते. या रेस्टॉरंटला एकदा आगदेखील लागली होती आणि अर्शदने 15 लाख रुपये खर्च करुन नुतनीकरण केले होते. लॉकडाऊननंतर तुशादने हॉटेल रिकामे करण्यावरुन वाद घालण्यास सुरुवात सुरुवात केली. या कालावधीत हारिस रंगुनावाला, डल्ला यांच्या रेस्टॉरंटमध्ये येत होता आणि त्यांची ओळख झाली. त्याने डल्ला यांना फोन करुन तुशादने रेस्टॉरंट रिकामे करण्यासाठी गुंडांना सुपारी दिल्याची माहिती दिली. त्यानंतर डल्ला यांनी तुशादविरोधात दिवाणी खटला दाखल केला. हारिसने यानंतर मध्यस्थी करुन देतो असे म्हणून डल्ला यांच्याशी जवळीक वाढवली. हॉटेल रिकामे करण्याच्या बदल्यात तुषाद 15 लाख रुपये देण्यास तयार आहे, असे त्याने सांगितले. 


हारिसच्या सांगण्यावरून डल्ला यांनी दिवाणी खटला मागे घेतला. इल्लाच्या रेस्टॉरंटचा ताबा देताना हारिस तेथे पोहोचला. त्याने कोणाला तरी फोन करुन 'आम्ही हॉटेल रिकामे करणार नाही, पैलवानांना घेऊन या' असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर हारिस, त्याचा भाऊ झैन, वडील आरिफ रंगुनवाला, डल्ला, तुशाद हे वडील धंतोली येथे पोहोचले. तेथे डल्ला यांना दुकान रिकामे करण्याच्या बदल्यात 14 लाख रुपये आणि एक लाखाचा धनादेश मिळाला. झैन याने संधी साधत डल्ला यांच्या हातातील नोटांची पिशवी घेऊन दुचाकीवरून पळ काढला. डल्लाने हारिसला हा प्रकार सांगितल्यावर त्याने चेक घेऊन घरी येण्यास सांगितले. रात्री दहाला डल्ला हारिसच्या घरी पोहोचला, त्याने सहा लाख रुपयेच दिले.


ठेवलेले सामन परत देण्यासाठीही खंडणी


उर्वरित चार लाख डल्ला यांनी मागितले असता हारिसने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय डल्ला यांनी हारिसच्या सांगण्यावरून भगवाघर चौक येथे जागेत रेस्टॉरंटचे लाखो रुपयांचे सामान ठेवले होते. ते सामान हवे असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा गोळ्या घालून जीव घेईल, अशी धमकी हारिसने दिली. अखेर डल्ला यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लूटमार, खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली.


ही बातमी देखील वाचा...


नागपुरातील 'रामबाग'मध्ये 'रावण राज'; गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या महिलांचा 'अक्कू यादव कांड' करण्याचा इशारा