एक्स्प्लोर

सांगली - खानापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस,अग्रणी नदीला पूर

मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अग्रणी नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोघेजण वाहून गेले आहेत.

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये रविवारी पाऊसाचा कहर झाला आहे. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर,तासगाव आणि कडेगाव या तालुक्‍यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अग्रणी नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोघेजण वाहून गेले आहेत.

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवादार असा पाऊस पडला आहे. दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्यातल्या तासगाव, कडेगाव आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तर इतर तालुक्यातील जोरदार पाऊस पडला आहे. विशेष खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणार्‍या नदी-नाले आणि अग्रणी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले. तर खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून झरे, बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे तर अन्य ओढ्यांनासुद्धा पूर आला आहे. तसेच विटा - कराड रोड वरील नांदणी व येरळा नदीवरील डायव्हर्शन केलेला कचे पूल नदीला आलेल्या पुराने वाहून गेले आहे. त्यामुळे विटा कराड रस्त्याची वाहतूक शिवणी मार्गे चालू आहे. याशिवाय जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना सुध्दा पूर आला आहे,त्यामुळे या ठिकाणी असणारे छोटे बंधारे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

दोघेजण वाहून गेले, शोधकार्य सुरू

मौजे करंजे येथे अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे करंजे- तासगाव रोड वरील अग्रणी नदीवर असलेल्या पुलावरून सिराज मुलाणी (46 वर्षे ) हा व्यक्ती दुचाकीवरून पुलावरून जात असताना वाहून गेलेला आहे. तसेच बलवडी खा. येथे अग्रणी नदीवरील पुलावरून दुचाकीवरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेली आहे . या दोघांचेही शोध कार्य सुरू आहे. तसेच मौजे वाळूज येथे वीज पडून किरण महादेव देशमुखे यांच्या दोन म्हशी दगावल्या आहेत. दुपारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget