Yavatmal News : एकीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असतानाच, दुसरीकडे राज्यात बनावट बियाणांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. अशाच बनावट बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केलीय. यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे बनावट बीटी कपाशीच्या बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या हाती लागली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचत ही कारवाई केलीय. यात सुमारे एक लाखांहून अधिक रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले आहे.

  


लाखोंच्या मुद्देमालसह एकास अटक


यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे काही व्यक्ति बोगस बियाणांची विक्री करत असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला आहे. यात 78 बोगस बियाण्यांचे पाकिट जप्त केले असून, मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विलास चिकटे (रा. चिंचाळा) याला अटक केली आहे. तर जप्त करण्यात आलेल्या बोगस बियाणांच्या पाकिटावर 863 रूपये किंमत लिहाली असल्याने या किंमतीनुसार त्यांची एकूण किंमत ही 1 लाख 1 हजार इपये इतका आहे.


हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पोलीस सध्या पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. जिल्ह्यातील तेलंगणा आणि गुजरात या परराज्यातुन खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विना परवाना विक्रीसाठी बनावट बियाणे येत असतात. याला अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाकडून 17 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 


तुरुंग अधिकार्‍यासह कर्मचाऱ्यांला आठ न्यायाधीन बंद्यांची मारहाण


यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने 8 न्यायाधीन बंद्यांनी चांगलाच राडा घातलाय. यात तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे आणि कर्मचारी सुरज मसराम यांना जबर मारहाण केलीय. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची ही खळबळजनक घटना यवतमाळच्या कारागृहात घडलीय. दरम्यान, कारागृह अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार कुंडले, जुनेद फारुक शेख, सतपाल रुपनवार, नैनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह शेख, मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या