Jalgaon News : सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्या (India Meteorological Department) वतीनं सांगण्यात आलं होतं. दरम्यान यामुळेच हवामानात उष्णता वाढली असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान तब्बल 42 अंशावर जाऊन पोहोचल्यानं सामन्यांना प्रचंड त्रास होत आहे. दरम्यान जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू देखील झाला आहे.


जितेंद्र माळी या शेतकऱ्यास उष्माघाताचा फटका बसला असून उन लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. जितेंद्र माळी हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेला होता. दिवस भर काम करून आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखाण्यात नेण्यात आले. मात्र उपचार करण्या आधीच जितेंद्र माळी यांचा मृत्यू आला. उष्माघाताने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात वाढत्या तापमानाचा विचार करता मंगळवारी तर चंद्रपूरात मंगळवारी 43.4 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. ज्यामुळे चंद्रपूर जगातील तिसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर म्हणून त्याची नोंद झाली आहे.


सन पॉयजनिंगचाही धोका


वाढत्या उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंगचा त्रासही जनतेला जाणवत आहे. तर सन पॉयजनिंग हे सनबर्नचेच घातक रुप आहे. तुम्ही अधिक वेळ सूर्याच्या अतिनील किरणाच्या संपर्कात राहिल्याने होतो. सन पॉयजनिंगचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचाराने समस्येवर मात करता येते. सन पॉयजनिंगमध्ये त्वचेवर गंभीर स्वरूपात रॅशेस् येणे, त्वचेवर फोड येणं, डिहायड्रेशन, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसंच बेशुद्ध होणे हे त्रास होत असतात. दरम्यान सन पॉयजनिंगपासून बचाव करण्याकरता सनस्क्रीनचा वापर करणे, उन्हात जाण्याआधी त्वचा पूर्ण झाकली जाईल असे पूर्ण कपडे घालणे. त्याशिवाय, सनग्लासेसचा वापर करणे, उन्हात जाताना टाइट कपड्यांऐवजी ढीले कपडे घालावे. तसेच उन्हाळ्यात सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान घरातून बाहेर न पडण्याचा प्रयत्न करणे असे उपाय आपण करु शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha