Diesel Smuggling: गुजरातमधून मुंबईत डिझेलची तस्करी करणाऱ्या टोळीचा सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. याबाबत माहिती देताना मुंबई पोर्ट झोनच्या डीसीपी गीता चव्हाण म्हणाल्या की, मुंबईच्या समुद्रात तेलाची तस्करी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर तीन टीम तयार करण्यात आल्या. पोलीस सोमवारी संध्याकाळपासूनच भाऊचा धक्का आणि आजूबाजूच्या समुद्रात गस्त घालून बोट शोधत होते. त्यानंतर काही तासांच्या तपासणीनंतर आम्हाला 2 बोटी सापडल्या, त्यामध्ये डिझेलचा अवैध साठा असल्याचे आढळून आले.


डीसीपी गीता म्हणाल्या की, "या प्रकरणी आम्ही 2 बोटी जप्त केल्या आहेत आणि 2 जणांना अटक केली आहे. आम्हाला या बोटीतून 10 हजार लिटरहून अधिक डिझेल सापडले आहे. ज्याची गुजरातमधून मुंबईत तस्करी केली जात होती." चव्हाण म्हणाल्या, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोठमोठ्या जहाजांमधून तेल काढून अशा छोट्या मासेमारी बोटींमध्ये साठवतात. त्यानंतर ते मुंबईत आणून स्वस्त दरात विकतात.


पोलिसांनी या प्रकरणी दीपक कुमार तांडेल आणि सुरेश भाई तांडेल या दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोघे आरोपी गुजरातचे रहिवासी आहेत. ते 15-20 दिवस खोल समुद्रात राहून मासेमारी करण्याचे काम करतात. त्यानंतर ते किनाऱ्यावर येतात. मोठा नफा कमावता यावा म्हणून हे लोक मासे सोबत डिझेलची तस्करी करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


महत्वाच्या बातम्या


Crime News : कोरोना काळात लावले अनेक बोगस लग्न, राज्यात फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय


राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी


Maharashtra School : राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द


Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...