नांदेड : राज्य सरकारला आरोग विभागाच्या परीक्षांचे नियोजन करता आलं नाही, परीक्षा वेळेवर होतील असं सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी रात्री 10 वाजता परीक्षा रद्द केली. त्यामुळे भविष्यात त्यांची जागा ही आर्थर रोड जेलमध्ये असेल अशी सनसनाटी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते देगलूर बिलोली निवडणूक प्राचारार्थ बोलत होते. 


भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी आरोग्य मंत्र्याना परीक्षेचे योग्य नियोजन करता आले नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीट मिळाले नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता, जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात आणि देशाच्या बाहेरही आले होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल असे म्हणणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली असे सांगून लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या-पाड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. अशा पद्धतीने वागणाऱ्या ह्या आरोग्य मंत्र्याची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असेल. "


नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसून गांजावाले व हर्बल तंबाखूवाल्यांचे प्रवक्ते आहेत असा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केला आहे. तर या निवडणुकीत मत मागण्यास  राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण दारात आले तर पायातले हातात घ्या असा अजब सल्ला गोपीचंद पडळकरांनी देगलूर बिलोली येथील मतदारांना दिला आहे.  


या आधीही भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक खळबळजनक वक्तव्यं केली आहेत.


महत्वाच्या बातम्या :