मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
Mucormycosis : 'म्युकोरमायकॉसिस'च्या उपचारासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा
या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचं असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
म्युकोरमायकॉसिस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Mucormycosis म्हणजे नेमकं काय? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहाने
काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?
- कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते.
- कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
- तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिसची लक्षणे काय?
- चेहऱ्यावर सूज येणे
- गाल दुखणे
- डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
- डोके दुखणे, नाक दुखणे
- रक्ताळ किंवा काळसर जखम