एक्स्प्लोर

विद्यार्थीनीच्या पाठीवरुन हात फिरवल्याचा आरोप, मुख्याध्यापकाची आत्महत्या

महिला कार्यकर्त्यांनी त्याचा जाब शाळेत जाऊन विचारला तसेच कावरे यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. त्याची चर्चा सर्वत्र होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कावरे यांनी आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे : इयत्ता 9 वीच्या विद्यार्थीनीच्या पाठीवरून हात फिरवणार्‍या मुख्याध्यापकास गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत  मारहाण केली. त्यानंतर मानसिक दबावाखाली या मुख्याध्यापकाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, मुख्याध्यापकास आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 महिलांसह पाच जणांविरूध्द सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कावरे असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक कावरे यांच्या पत्नी वर्षा अशोक कावरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी नवनाथ पारगे, पूजा पारगे, रोहिणी कुंभार, बाळासाहेब पारगे आणि सुवर्णा चव्हाण (सर्व रा. डोणजे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशोक कावरे हे एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शाळेतील काही विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना काही कारणावरून शिक्षा केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी कावरे यांना मारहाण केली. घडलेल्या प्रकाराच्या मानसिक दबावाखाली येऊन 24 सप्टेंबर रोजी कावरे यांनी कॅनॉलच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. वर्षा कावरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतली असता अशोक कावरे हे शाळेतील इयत्‍ता 9 वी मधील विद्यार्थीनींना शिक्षा म्हणून कधी-कधी मारहाण करीत होते. त्यावेळी ते विद्यार्थीनींच्या पाठीवरून हात फिरवत होते. ते विद्यार्थीनींना अजिबात आवडत नव्हते. म्हणून काही विद्यार्थीनींनी ही बाब गावातील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी त्याचा जाब शाळेत जाऊन विचारला तसेच कावरे यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. त्याची चर्चा सर्वत्र होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कावरे यांनी आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget