Headlines 31 January : अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे.  पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. 31 जानेवारी 2023 ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशन 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता बाईट देण्याची शक्यता आहे. भारताचे चीफ इकोनॉमिक एडवाईज आर्थिक सर्वेक्षणावर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतील.


आसाराम बापूला आज न्यायालय सुनावणार शिक्षा


गुजरात - महिला सहकाऱ्यांच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवलंय. आज आसाराम बापूला सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावली जाईल. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयात ही सुनावणी झालीय. 2013 मध्ये दोन बहिणीवरील अत्याचाराचं हे प्रकरण होतं. यात एकूण सात आरोपी होती. त्यापैकी आसारामची पत्नी, मुलगीसह सहा आरोपींची सुटका करण्यात आलीय.


एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज आंदोलन   


पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगाने त्यांचे म्हणणे एकावे यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आलं आहे, ज्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकातच जोरदार आंदोलन करण्यात आले होते. 


राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक
 
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे, सकाळी 11 वाजता.


कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 


पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी नक्की नसले तरी कोण कोण उमेदवारी अर्ज घेणार याबाबत उत्सकता. 


राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु, आज आंदोलनाचा 6 वा दिवस


शिर्डी – राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु असून आज आंदोलनाचा 6 वा दिवस आहे. अद्याप शासनाने या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नाही.


अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर
 
कोल्हापूर – अमित ठाकरे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजता अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उद्योग नगर या ठिकाणी महासंपर्क अभियानात सहभागी होणार आहेत. छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावणार आहेत.


भाऊसाहेब शिंदे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणा


अहमदनगर – सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी दिपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी असलेल्या आर्थिक संबधाबाबतचे पुरावे देणार असल्याचा त्यांचा दावा आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, मात्र त्यावेळी केवळ आरोप केले होते. मात्र आज पुरावे देणार असल्याचे त्यांचं म्हणणं आहे.


अकोल्यात आज एकदिवसीय 'मुकनायक' महोत्सव


अकोली – अकोल्यात आज एकदिवसीय 'मुकनायक' महोत्सव होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मुकनायक'चे पहिले संपादक अकोला जिल्ह्यातील केळीवेळीच्या पांडूरंग भटकर यांच्या कुटूंबियांना यावेळी सन्मानित केले जाणारेय. यासोबतच दिवसभर व्याख्याने आणि आंबेडकरी जलशांच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.


वरोरा येथील तहसील कार्यालयावर  शेतकऱ्यांचा मोर्चा


चंद्रपूर – वरोरा येथील तहसील कार्यालयावर दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. या भागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. कापूस-सोयाबीन यांची आयात थांबवून निर्यातीला परवानगी द्यावी, पीकविमा असलेल्या शेतकऱ्यांना 8 दिवसात नुकसान भरपाई द्यावी, नाफेडची चना खरेदी 7.5 वरून 15 क्विंटल करावी अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.