CM Government Plane : अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना आणि नायकडा समाजाच्या वतीनं जामनेर तालुक्यातल्या गोदरी गावात आयोजित महाकुंभाचा समारोप सोहळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईतून रवाना झाले खरे पण अचानक त्यांच्या विमानानं लँडिंग केलं. काय झालं नेमकं पाहुयात...


जळगावच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून निघाले, पण, विमानतळावर अडकले.. कारण उज्जाणासाठी सज्ज झालेलं विमान अचानक थांबलं. आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचाही जळगाव दौरा रद्द झाला. दोघांनी याच कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत लावली. बरं, ही काही पहिलीच वेळ नव्हती. की मुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड झालाय. याच महिन्यात 5 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर जातानाही याच प्रकारच्या विमानात बिघाड झाला होता. याच तांत्रिक बिघाडाची मालिका पाहिली. की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. झालेल्या घटनांची आठवण होते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरचा अनेकवेळा अपघात झाला. काही घटना तर इतक्या मोठ्या होत्या..की त्यांत देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचवले होते.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर दुर्घटना पाहूयात... (कार्यकाळ - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री  )


10 मे 2017  गडचिरोली - हेलिकॉप्टरला हवेतच बिघाड झाला होता.  


25 मे 2017- लातूर - देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. यामध्ये मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते. 


11 जानेवारी 2018 - भाईंदर - लँडिंगवेळी फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. 


7 जुलै 2018 - मुंबई - हेलकॉप्टर टेकऑफवेळी देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते. 


11 ऑक्टोबर 2019 - रायगड - हेलिकॉप्टर हेलिपॅडवरील चिखलात रुतलं होतं. 


फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा घटना घडल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टर्सवरुन अनेक चर्चाही रंगल्या होत्या. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात दुसऱ्यांदा बिघाड झाला आहे. सुदैवानं विमान टेकऑफच्या आधीच हे लक्षात आलं. त्यामुळे मोठा धोका टळला. भारताचा इतिहास पाहिला तर विमानत दुर्घटनेत अनेक महत्वाच्या व्यक्ती दगावलेल्या आहेत. त्याची यादीही मोठी आहे. 


विमान दुर्घटनेत दगावलेल्या महत्वाच्या व्यक्ती  


8 डिसेंबर 2021 - सीडीएस बिपीन रावत 


2009  - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी


सप्टेंबर 2001 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया


मार्च 2003- जी एम सी बालयोगी


1973 - काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम 


1980 - काँग्रेस नेते संजय गांधी 


अशा अनेक महत्वाच्या वक्तींना देशानं विमान दुर्घटनेतच गमावलंय. त्यामुळे आजच्या घटनेची तीव्रता आणखी वाढते.


आणखी वाचा :
CM Government Plane : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड, फडणवीस, राठोड यांचा खोळंबा, बिघाड होण्याची महिन्यातील दुसरी वेळ