Headlines 25 January : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकची आज महत्वाची बैठक आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभेच्या पोट निवडणुकी संदर्भात ही बैठक होणार आहे. अजित पवारांसह चार नेते मातोश्रीवर बैठकीला उपस्थित रहाणार. या दोन जागांवर उमेदवार दिले जाणार की निवडणुक बिनविरोध होणार? हे या बैठकीनंतर कळू शकेल. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे सरकार असताना मुंबई महापालिका एकत्र लढवण्यासंदर्भात सेना सकारात्मक होती. आगामी मुंबई महानगर पालिका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज शहारूख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार
पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे. अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत.
दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
मुंबई- आज सकाळी दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद आहे. दीपक केसरकर आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. सकाळी 9 वाजता
राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. राहुल गांधी यांनी राफेल बाबत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमांडर इन थीफ, अशी टीका केली होती. यामुळे राहुल गांधी विरोधात अब्रुनुकसानीची, भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे भाजप सदस्य असल्यानं अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना असल्याचं मत व्यक्त करत गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. मात्र गिरगांव कोर्टाच्या कार्यवाईवर 25 जानेवारी पर्यंत मुंबई हायकोर्टानं दिली आहे स्थगिती. ही स्थगिती कायम राहण्यासाठी उच्च न्यायालयात सुनावणी.
आज माघी गणेश जयंती
आज माघी गणेश जयंती आहे. त्यानिमित्त श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्राम सोने वापरण्यात आले आहे. या पाळण्यासाठी बाजूचे स्टँड साठी 10 किलो चांदी वापरण्यात आलीये. तर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मोठी गर्दी होते.
अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल
मुंबई – प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल. नेव्ही हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर्सच करतील भोसले यांची तपासणी. मात्र त्या संदर्भात सीबीआय तर्फे देण्यात आलेल्या यादीवर मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्ट आज देणार निर्णय.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार आहेत, संध्याकाळी 7 वाजता.
आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार
उत्तर प्रदेश – लखीमपूर खीरी शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्या प्रकरणी आज आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार आहे.
आज मोदी आणि मिस्त्रचे राष्ट्रपती सीसी यांची भेट होणार
दिल्ली – मिस्त्रचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांना प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणुन हजर रहाणार आहेत. आज मोदी आणि सीसी यांची भेट होणार आहे. 25 ते 29 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन बंद असणार आहे.
अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न
जयपूर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न आज राजमहल पॅलेस हॉटेल मध्ये होणार आहे.
रामदास आठवले यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता.
तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, सकाळी 8.30 वाजता. उस्मानबाद येथे जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत सहभागी होणार आहे.
बीडमध्ये जयंत पाटील यांची सभा
बीड – विक्रम काळेंसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी 1 वाजता सभा घेणार आहेत.
राज्य महिला आयोगाचा आज 30 वा वर्धापन दिन
मुंबई - राज्य महिला आयोगाचा आज 30 वा वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे, दुपारी 2 वाजता, सह्याद्री अतिथीगृह. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्या अध्यक्षा असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे.