एक्स्प्लोर

सिंचन घोटाळ्याची चौकशी संथ गतीने, हायकोर्ट स्वतः तपासावर लक्ष ठेवणार

सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी नेमलेली एसआयटी नेमकी काय करत आहे, असा संतप्त सवाल हायकोर्टाने केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीत पुढे काय प्रगती झाली, अशीही विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली.

नागपूर : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत काहीच प्रगती नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यामुळे हायकोर्ट आता स्वतः दोन न्यायमूर्तींची समिती स्थापन करुन एसआयटीवर लक्ष ठेवणार आहे. सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी नेमलेली एसआयटी नेमकी काय करत आहे, असा संतप्त सवाल हायकोर्टाने केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीत पुढे काय प्रगती झाली, अशीही विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली. दरम्यान, हायकोर्टाने नियुक्त केलेली जी समिती असेल, त्यामध्ये नेमकं कोण असेल, हे येत्या 12 तारखेला सांगितलं जाणार आहे. अजित पवार यांच्या चौकशीबाबत मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरही तसूभरही चौकशी पुढे गेली नाही, असं म्हणत हायकोर्टाने राज्य सरकारवर आणि एसआयटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हायकोर्टाकडूनच आता या घोटाळ्याच्या चौकशीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. काय आहे 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा? महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा 72 हजार कोटी रूपयांचा सिंचन घोटाळा आहे तरी काय? 72 हजार कोटी रूपयांचा घोटाळा थोडक्यात समजून घेण्यासाठी या दहा पॉईन्टची थोडीफार मदत नक्कीच होईल...
  1. विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पांची किंमत 6672 कोटी रूपयांवरून थेट 26722 कोटी रूपयांवर पोहोचली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही दरवाढ केली. अर्थातच ठेकेदारांच्या दबावाखाली...
  2. आणि ही थक्क करणारी किंमतवाढ मूळ प्रकल्पाच्या 300 पट आहे, किंमतवाढीच्या जास्तीच्या 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाला फक्त तीन महिन्यांमध्ये परवानगी मिळाली. जून, जुलै आणि ऑगस्ट 2009 मध्ये वाढीव खर्चाला कोणत्याही हरकतीशिवाय परवानगी देण्यात आली.
  3. व्हीआयडीसी म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही भाववाढ मंजूर करून घेण्यासाठी बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजूरांवरील खर्च आणि इंजिनीयरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ ही कारणे दिली. मात्र वाढीव खर्च मंजूर करवून घेण्यासाठी जी तत्परता दाखवण्यात आली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
  4. सर्वात थक्क करायला लावणारी बाब म्हणजे निम्न वर्धा प्रकल्पाला प्रशासकीय मंजूरी चक्क 15 या ऑगस्ट राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी मिळाली.
  5. या प्रकल्पाची किंमतही 950 कोटी रूपयांवरून 2356 कोटी रूपयांवर वाढवली गेली. अमरावतीमधील अप्पर वर्धा प्रकल्पाची किंमतही 661 कोटींवरून 1376 कोटी रूपयांवर पोहोचली. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदीवरील प्रकल्पाची किंमत 1278 कोटी रूपयांवरून 2176 कोटी रूपयांवर पोहोचली. या वाढीव खर्चाला 14 ऑगस्ट 2009 मध्ये परवानगी मिळाली. अप्पर वर्धा आणि बेंबळा नदीवरील प्रकल्प एकाच दिवसात म्हणजे 14 ऑगस्टला मंजूर झाले.
  6. 24 जून 2009 या एकाच दिवशी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने तब्बल दहा प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामध्ये वेसावली, लोणवडी, दगडपारवा आणि दावा या लघु प्रकल्पांचा तर हुमन नदी, खरबडी केटी वेअर, जियागाव, खडक पूर्णा, पेंटाकली आणि चंद्रभागा या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर व्हीआयडीसीने एकाच दिवसात लगेच सर्व 38 प्रकल्पांसाठी निविदाही जारी केल्या. व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक देवेन्द्र शिर्के यांनी हे सर्व प्रकल्प मंजूर केले.
  7. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व मोठ्या आणि लघु प्रकल्पांना आणि त्यांच्या वाढीव खर्चाला ज्या घाईघाईने मंजुरी दिली, त्यामुळे त्यांच्यावर संशयाचं धुकं साचलं.
  8. कॅग म्हणजेच महालेखापाल नियंत्रकांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली. जलसंपदा खात्याच्या काही अधिकाऱ्यांची कॅगने 24 सप्टेंबर म्हणजे सोमवारी चौकशी केली.
  9. जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी सर्व नियमांना फाटा देत फक्त नऊ महिन्यात तब्बल 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. तसं महिन्यांचा हिशेब लावायचा तर जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यातच 32 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी व्हीआयडीसीच्या सुकाणू समितीचीही संमती घेण्यात आली नाही.
  10. सर्वाधिक खळबळजनक म्हणजे मुख्य अभियंता पांढरे यांच्या गौप्यस्फोटाने तर जलसिंचन प्रकल्पांमध्ये 35 हजार कोटी रूपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या दहा वर्षात उभारण्यात आलेले प्रकल्प अतिशय निकृष्ट दर्जाच्या साधनसामुग्रीचे आहेत. सरकारने राज्यातील अशा सर्व प्रकल्पांवर तब्बल 70 हजार कोटी रूपयांचा खर्च केला आहे. सिंचन मात्र फक्त एक टक्काच झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Maharashtra Rain : गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
Nashik Rain: नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस
नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget