कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, पण आज पवारांच्या घरावर जो काही हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. या सगळ्या कामगारांना उसकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली जावीत अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
राज्यभर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटणार असल्याचं सांगत हसन मुश्रीफ म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांची आतापर्यंतची भाषणं तपासली जावीत. पहिल्यापासून त्यांनी या सगळ्या कामगारांना वेठीस धरलं. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याची खोटी स्वप्न दाखवून त्यांना उकसवण्याचं काम करण्यात आलं.
पवारांनी सातत्याने हा प्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न केले असं सांगत भाजपच्या पाच वर्षांच्या काळात एसटीचे विलिनीकरण का केलं नाही असा सवालही हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे.
दरम्यान, आज जी घटना घडली त्याची माहिती मला न्यायालयात असताना मिळाली. शरद पवारांच्या निवासस्थानी कोणी गेलं, आंदोलन केलं याची माहिती नाही. सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
आंदोलनाची चौकशी होणार
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध मुंबई पोलिस घेणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले का? कोणाच्या सांगण्यवरून आंदोलक येथे आले याची चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल
- Sharad Pawar : हंगामा कोण केला याची लाय डिटेक्टर चाचणी करा: अॅड. गुणरत्न सदावर्ते
- ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती