मुंबई: गेल्या पाच महिन्यापासून सुरु असलेल्या संपावर न्यायालयाने कष्ठकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. पण आज जी घटना घडली त्याची माहिती मला न्यायालयात असताना मिळाली. शरद पवारांच्या निवासस्थानी कोणी गेलं, आंदोलन केलं याची माहिती नाही. सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. 


गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "कष्ठकरी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत. हल्ला केला असं शरद पवारांनीही कुठेही म्हटलं नाही. मलाही कुठेही तसं कोणी हल्ला केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे या कष्टकऱ्यांना बदनाम करू नका."


शरद पवारांनी आतापर्यंत जातीय आणि गलिच्छ राजकारण केलं आहे असं सांगत आपल्या आणि अॅड. जयश्री पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. 


गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासा
आज घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,  "आज पवारांच्या घरावर जो काही हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. या सगळ्या कामगारांना उसकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली जावीत अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे."


महत्त्वाच्या बातम्या: 



Gunaratna Sadavarte: आमचा खून केला जाऊ शकतो- गुणरत्न सदावर्ते ABP Majha