एक्स्प्लोर

शिरपुरातील दहा जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर पॅनलचं वाटप

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील जिल्हा परिषदेच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील दहा जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर ऊर्जा पॅनलचं वाटप करण्यात आलं.

धुळे : शाळा डिजीटल होऊनही विजेच्या समस्येमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. या समस्येवर उपाय म्हणून हर्षल विभांडीक या तरुणाने आदिवासी पाड्यावरील शाळांना विजेची समस्या उद्भवू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील दहा शाळांना सौर ऊर्जा पॅनलचं वाटप करण्यात आलं. शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील जिल्हा परिषदेच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील दहा जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर ऊर्जा पॅनलचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची उपस्थिती होती. डिजीटल शाळेचा धुळे पॅटर्न सरकार आता संपूर्ण देशात राबवण्याच्या विचारात आहे. मात्र असं असताना धुळे जिल्ह्यातील काही आदिवासी पाड्यांवर उद्भवणाऱ्या विजेच्या समस्येमुळे तेथील विद्यार्थ्यांना डिजीटल माध्यमातून शिक्षण मिळवण्यात अडचणी येतात. यावर उपाय म्हणून हर्षल विभांडीक यांनी केवळ शिरपूरमधीलच नव्हे, तर धुळे जिल्ह्यातील, राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यातील शाळा डिजीटल केल्या आहेत. लाकड्या हनुमान येथे जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना सौर पॅनल वाटप कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. राजीव खांडेकर, राहुल रेखावार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. गावातील मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची एक नवी प्रथा यावेळी सुरु करण्यात आली. उपस्थित पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना राजीव खांडेकर यांनी हर्षल विभांडीक यांच्या कार्याचं कौतुक केलं. काम करताना जो उत्साह सुरुवातीला असतो, तोच उत्साह शेवटपर्यंत कायम असावा, असं म्हणत हर्षल विभांडीक यांना मिळालेली इतरांची साथही महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी ही जशी शिक्षकांची, तसं चांगलं नागरिक व्हायचं असं म्हणताना ऐकायला मिळत नाही, अशी खंत राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026: मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी; बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भावूक!
मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी; बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भावूक!

व्हिडीओ

Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget