Haribhau Rathod : ज्या मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) मागणीची पूर्तता करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात आले आहे. त्याच मागणीला बगल देऊन सरकारने मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार  हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिली आहे. 


मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता विधिमंडळात पोहोचला असून याबाबत आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाच्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. यावर हरिभाऊ राठोड यांनी आपली मत व्यक्त केले आहे.


मनोज जरांगेंच्या मागणीला सरकारकडून बगल


हरिभाऊ राठोड म्हणाले की, जरांगे पाटील यांची मागणी ओबीसीमधून (OBC) होती. सगेसोयरे याचा अर्थ कुणबी असल्याचे दाखले मिळण्याची होती. या दोन्ही मागण्यांना बगल देण्यात आली आहे. मात्र जरांगे पाटलांची ओबीसीमधून आरक्षण देण्याचे मागणी कायदेशीर, टिकाऊ  आणि संविधानिक आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.


हरिभाऊ राठोडांचा राज्य सरकारला सल्ला


हे आरक्षण देताना कुणबी, मराठा एक करून भारतरत्न कर्पुरी ठाकुर फार्मूला लावल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठी समाजाला आरक्षण देता येईल, असा सल्लाही हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारला दिला आहे.


मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजावर अनन्या होत नसल्याची स्पष्टता द्यावी; भुजबळांची मागणी 


मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भुमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अनन्या होत असल्याची भावना भुजबळांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजावर अन्याय होत नसल्याची स्पष्टता सभागृहात द्यावी, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे. त्यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केली आहे. 


काय म्हणाले छगन भुजबळ


आरक्षण टिकावे यासाठी बिल तयार करण्यात आले आहे. अनेक माजी न्यायमूर्तींनी यावर लक्ष घेतले आहे. अद्याप प्रस्ताव आमच्या हातात आलेला नाही.  सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आला आहेत. समता परिषद ओबीसी संघटनांचे मी अभिनंदन करतो. केवळ गटनेत्यांनी बोलण्याची मुभा मला मंजूर नाही, सगळ्यांना बोलू दिले पाहिजे असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Maratha Reservation: सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ नका मग तुम्हाला पश्चाताप म्हणजे काय असतो, याची प्रचिती येईल; मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा