Chhagan Bhujbal :  मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता विधिमंडळात पोहोचला आहे. यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन (Special Assembly session) बोलावण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण टिकावे यासाठी बिल तयार करण्यात आले आहे. अनेक माजी न्यायमूर्तींनी यावर लक्ष घेतले आहे. अद्याप प्रस्ताव आमच्या हातात आलेला नाही.  सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आला आहेत. समता परिषद ओबीसी संघटनांचे मी अभिनंदन करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  


...तर जातीय जनगणना करा


बाठिया आयोगानं केलेली जनगणना असेल किंवा सध्याच्या शुक्रे कमिशननं केलेली जनगणना असेल, या कुठल्याच आयोगाची जनगणना आम्ही मान्य करत नाही. तुम्हाला खरंच कुठला समाज किती आहे याचे आकडे हवे असतील, तर जातीय जनगणना करा असेही त्यांनी म्हटले आहे. 


तर वेगळा कायदा करायची गरज काय आहे?


जरांगे सांगतात तस करायचं असेल 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचं असेल तर वेगळा कायदा करायची गरज काय आहे? गायकवाड आयोगाचं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं आहे.  आता त्या त्रुटींचा विचार केलेला आहे. फक्त गटनेत्यांनी बोलण्याची मुभा मला मंजूर नाही.  सगळ्यांना कायद्यावर बोलायला दिले गेले पाहिजे.  


मला माहित नाही


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला अद्याप याबाबत काही माहिती नाही. मात्र जेवढ्या जागा शिंदे गटाला देणार तेवढ्या आम्हाला देखील दिल्या गेल्या पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  


काय म्हणाले मनोज जरांगे?


दोन-तीन लोकांना मराठा समाजाचे वाटोळ करायचे आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचे हत्यार आहे. आताही मराठा आरक्षण टिकले नाही तर तेच होणार आहे. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारे आमचे आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. 


आणखी वाचा 


महायुतीमध्ये तिढा, शिवसेनच्या जागांवर भाजप नेत्यांकडून दावा, शिंदेंची धाकधूक वाढली