एक्स्प्लोर

बजरंगबलीच्या जन्मस्थानाचा वाद! हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे तर किष्किंदा, मठाधिपतींचा दावा

हनुमानाच्या जन्मस्थळावरुन महंत आणि साधूंमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे.

Hanuman Temple Issue : हनुमाना तुझा जन्म कुठला? असा प्रश्न आता थेट हनुमानालाच विचारण्याची वेळ आलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण हनुमानाच्या जन्मस्थळावरुन महंत आणि साधूंमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. त्यासाठी ते त्र्यंबकेश्वरात आंदोलन करताहेत. तर नाशिकमधील काही साधू महंतांनी या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. 

राम जन्मभूमी, काशी मथुरा नंतर पुन्हा हनुमान जन्मस्थळाचा वाद उफाळला आहे.  किष्किंदा येथिल मठाधिपती त्रंबकेश्वरमध्ये ठाण मांडून बसले आहेत हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदा असल्याचा दावा ते करत आहेत. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंदा येथे भव्य हनुमान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. नाशिकच्या साधू महंतांमध्ये मात्र विरोधाभास असल्याचं दिसत आहे. महंत सुधीरदास हनुमान जन्मस्थान अंजनेरी असल्याचे दावे करत आहेत तर अनिकेत शास्त्री किष्किंदा असल्याचा मान्य करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थानावरुन आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद समोर आला होता. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केला होता. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं.

कर्नाटक आणि आंध्रातील हा वाद जुना असताना आता नाशिक की किष्किंदा हा वाद समोर आला आहे. कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री इथं झाला, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं होतं, की तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.
  
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांचं मत आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Embed widget