नागपूर : एड्स या रोगाचं नाव ऐकलं की अनेकांची भीतीने गाळण उडते. पण या रोगाच्या निवारणासाठी नागपूर महापालिकेने जो उपाय योजला होता तो ऐकून कोणालाही घाम फुटेल.


 

एड्स निवारण आणि जनजागृतीसाठी नागपूर महापालिकेने तब्बल दीड लाख लोकांसाठी हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाविरोधात एका स्वयंसेवी संस्थेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर नागपूर खंडपीठाने कडक शब्दात ताशेरे ओढलेत.

 

हनुमान चालिसा पठणाने एड्स निवारण कसं होईलं असा सवाल विचारत कोर्टाने महापालिकालेला कार्यक्रमात बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कोर्टाच्या दणक्यानंतर आता या कार्यक्रमाचं आयोजन पोद्दारेश्वर राम मंदिराकडे देण्यात आलं आहे.

 

`नैतिकता पाळा, एड्स टाळा' - हे ब्रीदवाक्य घेत, जागतिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने एड्स रोगाबद्दल सर्व सामन्यांमध्ये जनजागृती निर्माण करताना, त्याच्या अंतर्गत मारुती स्तोत्राच्या पठणाचा कार्यक्रम देखील केला होता. १ लाख हनुमान-भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करत याचा 'गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' अंतर्गत नोंदणी करण्याचा प्रयत्न पालिकेचा होता. पण आता कोर्टाने झापल्यामुळे पालिकेच्या आशेवर पाणी फेरलं आहे.