एक्स्प्लोर

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी परत मिळणार

आरक्षण, नोकरभरती आणि फी सवलतीच्या मुद्द्यांवरुन राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला होता. याची दखल घेत सरकारकडून हा अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील आठ लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यासंदर्भात आज अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत काल (29 ऑगस्ट) पार पडली. "मराठा समाजातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना 605 अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय घेतला आहे. असे प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जवळजवळ सर्वच संस्था, महाविद्यालयांनी निम्मे शुल्क भरून प्रवेश दिले आहेत. तरीही ज्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शुल्क भरून प्रवेश दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांना देण्यात येणारी उर्वरित रक्कम महाडीबीटीमार्फत वितरीत करण्यात यावी.", असे चंद्रकांत पाटील म्हणाले. विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील आठ लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेमधील (सारथी) पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच सारथीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी तातडीने सुरू करण्यात यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. कृषी विषयक 27 अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीला मराठा समाजाच्या तरुणांसाठी कृषी विषयक 27 अभ्यासक्रम राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार असून त्यातून अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तसेच स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. सांगली आणि कोल्हापुरात वसतिगृह सुरु : चंद्रकांत पाटील राज्य शासनाच्या वापरात नसलेल्या इमारती ताब्यात घेऊन कोल्हापूर, सांगली येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यात लवकरात लवकर वसतीगृहे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसात ही वसतीगृहे सुरू होतील. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मूक मोर्चे ते ठोक मोर्चे.... नंतर सरकारला जाग गेल्या दोन वर्षात मराठा समाजाकडून आरक्षणासाठी मूक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतरही सरकारच्या कानी आपला आवाज पोहोचत नाही, हे कळल्यावर मराठा समाजाने आंदोलन आक्रमक करण्यास सुरुवात केली आणि ‘ठोक मोर्चे’ काढण्यास सुरुवात केली. या मोर्चांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत, नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठीची कायदेशी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचे ठरवले.

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
Embed widget