लातूर : दुष्काळातून सावरत असलेल्या मराठवाड्याला गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शिवाय सोलापूर जिल्ह्यातही गारपीट झाली. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याने यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र   अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे हाताशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे.

बीडमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

लातूरनंतर अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याकडे कूच केली. परळी तालुक्यातील कौठाळी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे.

गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.

शिवाय लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही गारपीटीचा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनेश्वर देवस्थान येथील जुनं चिंचेचं झाड कोसळल्याने गाड्यांचं नुकसान झालं.

लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान

लातूर जिल्ह्यातील समुद्रवाणी, लासोना परिसरात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष, आंबा, हरभरा आणि ज्वारी पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी निटुर शिरुर अनंतपाळ औसा आदी तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या ग्रामीण भागात हरभरा, तूर, ज्वारी या पिकाची रासणी सुरु आहे.

औसा तालुक्यातील किल्लारी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा असून जिल्ह्यात अनेक भागात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चालू वर्षी शेतकऱ्यांना आंबा आणि द्राक्ष पिकातून उत्त्पन्न हाती मिळण्याची आशा असताना अवकाळी पावसामुळे आंबा आणि द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे. तर औसा तालुक्यातील तावशी, ताड, मासुर्डीसह काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतमालाचे आणि फळ, भाजीपाला पिकाचं नुकसान झालं.

परभणीतही पावसाची हजेरी

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. हाताशी आलेला गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नांदेडमध्ये सायंकाळच्या वेळेला पावसाने हजेरी लावली. तामसा, भोकर, लोहा या तालुक्यात विजांसह पाऊस बरसला. नांदेडमध्येही पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.

⁠⁠⁠⁠जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश

मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गारपीटग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर लवकरात लवकर कशी मदत देता येईल त्यासाठी प्रयत्न करु, असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. शिवाय अधिवेशन झाल्यावर या भागात भेट देणार असल्याचंही ते म्हणाले.

लाईव्ह अपडेट :

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गारपीटग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यावर कशी लवकरात लवकर मदत देता येईल त्यासाठी प्रयत्न करु, अधिवेशन झाल्यावर या भागात भेट देणार, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

लातूर- जिल्ह्याभरात अद्यापही पाऊस सुरुच, उदगीर तालुक्यातील तोंडार येथे मुसळधार पाऊस, लातूर शहारासह जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच

बीड : योगेश्वरी शिक्षण संस्था भोगलवाडी संचलित अध्यापक महाविद्यालय कारी येथे वादळामुळे नुकसान

परभणी- सोनपेठ शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. हाताशी आलेला गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.

लातूरनंतर अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याकडे कूच केली आहे. परळी तालुक्यातील कौठाळी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे.

बीड - गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील समुद्रवाणी, लासोना परिसरात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष, आंबा, हरभरा आणि ज्वारी पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी निटुर शिरुर अनंतपाळ औसा आदी तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या ग्रामीण भागात हरभरा, तूर, ज्वारी या पिकाची रासणी सुरु आहे.

औसा तालुक्यातील किल्लारी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा असून जिल्ह्यात अनेक भागात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चालू वर्षी शेतकऱ्यांना आंबा आणि द्राक्ष पिकातून उत्त्पन्न हाती मिळण्याची आशा असताना अवकाळी पावसामुळे आंबा आणि द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे. तर औसा तालुक्यातील तावशी, ताड, मासुर्डीसह काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतमालाचे आणि फळ, भाजीपाला पिकाचं नुकसान झालं.

संबंधित बातम्या :

बीडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू

मराठवाड्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान

उस्मानाबादलाही गारपीटीचा तडाखा, पिकांचं नुकसान