सात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2017 11:45 AM (IST)
कोल्हापूर : कोल्हापुरातील सात भटक्या कुत्र्यांनी तीन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात स्पृहा उपाध्ये ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. वर्षानगर परिसरात स्पृहा उपाध्ये तिच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये खेळत होती. मात्र त्यावेळी सात मोकाट कुत्र्यांनी स्पृहावर अचानक हल्ला केला आणि तिला ओढत, फरफटत गेटबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट तिचे पालक आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत कुत्र्यांनी तिचे लचके तोडले होते. यानंतर लोकांनी स्पृहाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करुन तिला दवाखान्यात दाखल केलं. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं.