एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर पडताच व्हिक्ट्रीचं साईन दाखवत सदावर्तेंची घोषणाबाजी; म्हणाले, जुलुम...

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यांना कोठडीतून सातारा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी जेलमधून बाहेर पडताच त्यांनी व्हिक्ट्रीचं साईन दाखवत घोषणाबाजी केली.

Gunratna Sadavarte : शरद पवारांच्याघरावरील हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यांना आज कोठडीतून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी जेलमधून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्हिक्ट्रीचं साईन दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी 'भारत जितेगा, जुर्म हारेगा', जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो, असं म्हणत व्हिक्ट्रीचं साईन दाखवलं.

सदावर्ते यांना दिलासा मिळणार की अडचणी वाढणार याचा फैसला काही वेळात होणार आहे.  मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  सातारा पोलिसांनी खबरदारी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. मोठा पोलीस फौजफाटा हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आला.

मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये गुन्हा दाखल

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी संपण्याचा नाव नाही घेत आहेत. मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये  सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.

सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget