Maharashtra Politics Gulabrao Patil On Milind Narvekar: शिंदे समर्थक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी काल धुळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सेवक चंपासिंग थापा (Champasingh Thapa) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही (Uddhav Thackeray PA Milind Narvekar) शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. शिवसेनेतील बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचं वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे. 


यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.


बिग बॉसमध्ये (Bigg Boss) बोलावलं नक्की जाऊ


दोन दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी बिग बॉसमध्ये (Bigg Boss) बोलावलं नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असं म्हटलं होतं. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो. असे सांगत आणि आता बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.


दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मराठी बिग बॉस होस्ट करणारे महेश मांजरेकर यांना नुकताच प्रश्न विचारण्यात आला होना की, राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉसमध्ये तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर महेश मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या


Marathi Bigg Boss : 'संधी मिळाली तर बिग बॉसमध्येही जाऊ'; नव्या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा चर्चेत


Gulabrao Patil Full : ठाकरेंवर हल्लाबोल, उर्दू भाषेत शायरी, गुलाबरावांनी जळगावची सभा गाजवली