Maharashtra News : पनवेल आयटीआय कॉलेजची (ITI College) अवस्था 'एबीपी माझा' (ABP Majha Impact) ने दाखविल्यानंतर आज राज्याच्या कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व 427 प्राचार्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलवून आढावा घेतला. मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीत आयटीआयचे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण व्यवस्थेचा हे वास्तव 'एबीपी माझा'ने (Majha Impact) दाखवल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) याची दखल घेतली आहे. त्यामुळे अशाप्रकारे जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याचा कौशल्य विकास विभागाकडून ठरवण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यात राज्यातील सर्व आयटीआय महाविद्यालयातील अवस्था दूर होईल असा आश्वासन कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिला आहे


इमारतीच्या दुरुस्तीसाठी शिवाय राज्यातील इतर आयटीआय महाविद्यालयात नेमकी काय स्थिती आहे? त्याची माहिती समजून घेण्यासाठी, कौशल्य विकास मंत्र्यांनी सचिव, त्यासोबतच आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली.जिथे जिथे इमारतीची दुरवस्था आहे तिथे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी यामध्ये सरकारी अधिकारी आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीचे लोक सुद्धा आहेत. ते इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करतील. इमारतीच्या बांधकामासाठी याआधी फंड दिलेले आहेत.मात्र अधिकचा निधी लागत असेल तर तातडीने देण्यात येणार असल्याच लोढा यांनी सांगितला. ज्या ज्या आयटीआय कॉलेजमध्ये इमारतीची दूर अवस्था आहे आणि बांधकामाची गरज आहे तिथे एका महिन्याच्या आत काम सुरू होईल. या संदर्भात मंगल प्रभात लोढा हे  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना यांना सुद्धा भेटणार आहेत


सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या आयटीआय मध्ये शिकतात त्यासाठी सरकारने नक्कीच पाऊल उचलेल. शिवाय,आम्ही आयटीआय महाविद्यालयात कॅन्टीन सुद्धा लवकरच सुरू करतोय. पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेतली जाईल. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या आत महाराष्ट्रातील सर्व आयटीआय महाविद्यालयाची दुरवस्था दूर होईल, अशी माहिती मंत्री लोढा यांनी 'एबीपी माझा'ला दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :