एक्स्प्लोर
पिंपरीत तरुणावर आठ जणांकडून अंदाधुंद गोळीबार

पिंपरीः पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरात तरुणावर सात ते आठ तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुण गंभीर झाला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
अमित चव्हाण असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आदित्य आहिरराव, सिलव्या उर्फ संदेश चोपडे, संदीप पवार आणि इतर पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. एकही गोळी न लागल्याने अमित बचावला असला तरी तो यात गंभीर जखमी झाला आहे. अमितला कोयता आणि लाथा-बुक्कयाने जबर मारहाण करण्यात आली.
अमितवर हा हल्ला कशामुळं करण्यात आला, याचा पोलिस तपास करत आहेत. मात्र गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. पिंपरी परिसरात गेल्या काही दिवसात गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
