एक्स्प्लोर

सोलापुरात पुन्हा एकदा ‘ग्रीन कॉरिडॉर’

सोलापूरकरांनी आज ग्रीन कॉरिडॉरचा अनुभव घेतला. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा सोलापूरकरांनी दातृत्वाच दर्शन घेतलं.

सोलापूर : सोलापूरहून पुण्यात अवयव नेण्यासाठी सोलापुरात ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या कुशलतेने अवयवदान प्रक्रियेसाठी जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करुन दिला. अवयवदानासंदर्भात आता जनमानसात सकारात्मक पाऊल उचलली जात आहेत. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव गरजूंना दान करण्याची मानसिकता रुढ होते आहे. असाच दिलदारपणा आज सोलापुरातल्या एका कुटुंबाने दाखवला. मेंदू मृत झालेल्या एका महिलेचे अवयव आज पुण्याला पाठवण्यात आले. त्यासाठी सोलापुरात आज ग्रीन कॉरीडॉर करण्यात आला होता. सोलापूरकरांनी आज ग्रीन कॉरिडॉरचा अनुभव घेतला. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा सोलापूरकरांनी दातृत्वाच दर्शन घेतलं. सोलापुरातल्या यशोधरा हॉस्पिटलमधून पुण्याला अवयव नेण्यासाठी आज सकाळीच ग्रीन कॉरिडॉरची तयारी झाली होती. पोलिसांनी मोठ्या कुशलतेने अवयवदान प्रक्रियेसाठी जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. मोहोळ तालुक्यातील हिवरे गावातल्या कविता डिकरे या महिलेवर 6 ऑक्टोबर रोजी शेतात काम करताना वीज कोसळली होती. त्यांना उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारातून सुधारणा तर झाली नाहीच, उलट परिस्थिती बिकट बनत गेली. काल संध्याकाळी मेंदू मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. कुटुंबियांना अवयवदानासंदर्भात समुपदेशन करण्यात आलं. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डिकरे कुटुंबीयांनी मानाचा मोठेपणा दाखवत अखेर अवयवदानाला संमती दर्शवली. शासकीय सोपस्कार पूर्ण करून आज सकाळी कविता यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु झाली. लिव्हर, किडनी, डोळे आणि ह्रदय गरजूंना देण्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण केली गेली. पुण्यातल्या रुग्णाला लिव्हर पाठवण्यात आलं, तर दोन्ही किडन्या सोलापुरातल्या रुग्णालयात गरजू रुग्णांना देण्यात आल्या. यशोधरा हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत कमी वेळात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठीची प्रक्रिया मोठ्या कौशल्याने पार पाडली. संकट काळात उदार मनाने अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या डिकरे कुटुंबियाच कौतुक करावं तेवढ कमी. घरातली व्यक्ती देवाघरी गेली तरी तिच्या रूपाने तीन-चार व्यक्तींना जीवदान मिळालं. अवयवदानासंदर्भात होत असलेली ही जनजागृती समाजमनाला नवी दिशा देणारी ठरली.

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात, मविआच्या पॅनलऐवजी भाजप-शिंदे गटासोबत बांधले संधान; छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात, मविआच्या पॅनलऐवजी भाजप-शिंदे गटासोबत बांधले संधान; छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Embed widget