वाशिम : एक नातू आपल्या 110 वर्षांच्या आजोबाला खांद्यावर घेऊन पायी मुंबई ते वाशिम प्रवासाला निघाला होता. ही बातमी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीची दखल घेऊन धुळे येथील प्रतिभा शिंदे यांनी आजोबा आणि नातवाला घरापर्यंत पोहचण्यास मदत केली. तब्बल सहा दिवसांनंतर हे दोघे घरी पोहचले. घरी पोहचल्यानंतर त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले. असे असले तरी त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मजल दरमजल करत मिळेल त्या वाहनाला हात करत पायी शेकडो किलोमीटर पायपीट केली.


कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने देशभर पसरत आहे. देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. काम नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने घरीही जाता येत नाही. कोरोना विषाणूचा संक्रमण होण्याचीही भीती. त्यामुळे अनेकांनी पायीच घरचा रस्ता धरला आहे. लॉकडाऊननंतर पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात अडकलेल्या नागरिकांची घरी जाण्यासाठीची व्यथा एबीपी माझाने दाखवत आहे. यापैकीच शिंदे कुटुबातील एका आजोबाची आणि नातवाची पायपीट दाखवली होती. मुंबईत अडकलेल्या एका नातू आपल्या 110 वर्षांच्या आजोबांना खांद्यावर घेऊन पायीच वाशिमला निघाला होता.


12 मे पासून विशेष रेल्वे सेवा, पहिल्या टप्प्यात दिल्लीहून देशात 15 ठिकाणी वाहतूक


तब्बल सहा दिवसांच्या प्रवासानंतर ते दोघे घरी


वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर येथील शिंदे कुटुंबातील 110 वर्षांच्या आजोबाला नातावाने आपल्या खांद्यावर घेऊन मुंबईहून खानापूरची वाट धरली होती. याबाबत एबीपी माझाने वृत्त दाखवले होते. ही बातमी पाहून धुळे येथील प्रतिभा शिंदे त्यांच्या मदतीला धावून आले. या मजूर शिंदेला धुळ्यावरून जळगावपर्यंत नेण्यासाठी मदत केली. रस्त्यात भेटेल त्या वाहनाने प्रवास करत हे कुटुंब तब्बल सहा दिवसानंतर कारंजाच्या खानापूर इथं पोहचल. यावेळी त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले.


12 मे पासून विशेष रेल्वे सेवा सुरू होणार


नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांसाठीही रेल्वे विशेष ट्रेन सेवा सुरू करणार आहे. या विशेष रेल्वे सेवांची वाहतूक मंगळवार, 12 मे 2020 पासून होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतून देशभरातल्या 15 ठिकाणी या रेल्वेसेवा सुरू केल्या जातील. 15 ट्रेन जाणार आणि तिथून दिल्लीत परतणार अशा 30 फेऱ्यांना रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलीय.


Lockdown Special Trains | 12 मे पासून प्रायोगिक तत्त्वावर 15 ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार