मुंबई : राज्यात सलग पाचव्या दिवशी हजाराच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज दिवसभरात नवीन 1278 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. परिणामी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 हजार 171 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज सगळ्यात जास्त 53 रुग्णांचा मृत्यू झालाय. एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आज झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज 399 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 4199 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 38 हजार 766 नमुन्यांपैकी 2 लाख 15 हजार 903 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 22 हजार 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 832 झाली आहे.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: 13,739 (508)
ठाणे: 121 (2)
ठाणे मनपा: 880 (8)
नवी मुंबई मनपा: 826 (4)
कल्याण डोंबिवली मनपा: 351 (3)
उल्हासनगर मनपा: 26
भिवंडी निजामपूर मनपा: 30 (2)
मीरा भाईंदर मनपा: 214 (2)
पालघर: 34 (2)
वसई विरार मनपा: 229 (10)
रायगड: 92 (1)
पनवेल मनपा: 138 (2)
ठाणे मंडळ एकूण: 16,680 (544)
नाशिक: 59
नाशिक मनपा: 38
मालेगाव मनपा: 562 (34)
अहमदनगर: 54 (3)
अहमदनगर मनपा: 9
धुळे: 9 (3)
धुळे मनपा: 45 (1)
जळगाव: 144 (12)
जळगाव मनपा: 34 (7)
नंदूरबार: 22 (2)
नाशिक मंडळ एकूण: 976 (64)
पुणे: 162 (5)
पुणे मनपा: 2377 (146)
पिंपरी चिंचवड मनपा: 140 (4)
सोलापूर: 9
सोलापूर मनपा: 241 (11)
सातारा: 119 (2)
पुणे मंडळ एकूण: 3048 (168)
कोल्हापूर: 13 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 33
सांगली मिरज कुपवाड मनपा: 4 (1)
सिंधुदुर्ग: 6 (0)
रत्नागिरी: 36 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण: 98 (3)
औरंगाबाद: 93
औरंगाबाद मनपा: 475 (13)
जालना: 12
हिंगोली: 59
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 1
औरंगाबाद मंडळ एकूण: 641 (14)
लातूर: 25 (1)
लातूर मनपा: 0
उस्मानाबाद: 3
बीड: 1
नांदेड: 4
नांदेड मनपा: 39 (3)
लातूर मंडळ एकूण: 73 (4)
अकोला: 17 (1)
अकोला मनपा: 142 (10)
अमरावती: 4 (1)
अमरावती मनपा: 78 (11)
यवतमाळ: 96
बुलढाणा: 24 (1)
वाशिम: 1
अकोला मंडळ एकूण: 362 (24)
नागपूर: 2
नागपूर मनपा: 249 (2)
वर्धा: 0
भंडारा: 1
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 3
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 257 (2)
इतर राज्ये: 36 (9)
एकूण: 22 हजार 171 (832)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1237 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 768 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 55.61 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.


Lockdown Special Trains | 12 मे पासून प्रायोगिक तत्त्वावर 15 ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार