अमरावती : उच्चशिक्षित विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. मात्र आपल्या आजीने आईला विष दिल्याचा आरोप विवाहितेच्या मुलांनी केला आहे.

 
40 वर्षीय सुनेने आपले 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप सासूने केला होता. याच वादातून सासूने सुनेला विष आणून दिलं आणि प्यायला लावलं असा आरोप विवाहितेच्या मुलांनी केला आहे.

 
आत्महत्या केलेल्या महिलेचं एमएपर्यंत शिक्षण झालं होतं. 15 वर्षीय मुलांच्या आरोपानंतर पोलिसांनी विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूला अटक केली आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.