उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात 85 वर्षांच्या आजीबाई उतरल्या आहेत. या आजीबाईंचे नाव आहे सुमनबाई माने. परंडा तालुक्यातील कपिलापुरी गावच्या त्या रहिवासी. कपिलापुरी ग्रामपंचायतचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्थापनेपासून एक अपवाद वगळता कायम बिनविरोध निवडून दिली जाणारी पंचायत आहे.
वय 85 वर्षे. हातात काठी. शरीर वार्धक्याने काहीसे थकले-वाकलेले असले, तरी श्वासात आणि नसानसात विचार भिनलाय तो गावविकासाचा. विकासाबद्दल केलेल्या कामाची त्यांना पावती मिळाली आहे ती थेट राष्ट्रपतींकडूनच. ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल. मागील 40 वर्षांपासून ग्रामपंचायतीचे सदस्यपद त्या सांभाळत असल्या, तरी यंदाही त्यांची निवडणूक लढायची उमेद तसूभरही कमी झालेली नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी या वयातही त्या सुनेला सोबत घेऊन आल्या होत्या परंडा तहसीलमध्ये. तेथे कोण या आजीबाई? अशी विचारणा आणि चर्चा सर्वामुखी होती.
सुमनबाई यांना या वेळीही बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास वाटतो. म्हणून तर गावातील सर्वांच्या विचाराने निवडणूक बिनविरोध पार पडत आली आहे. आताही सुमनबाई यामध्ये महिला मतदारांची 276 तर पुरुष मतदारांची 310 संख्या असून एकूण 586 मतदार आहेत. कपिलापुरी हे गाव शेती उत्पादनात सधन असून येथील बहुतांशी शेतकरी माने ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. शेती उत्पादनावर अवलंबून आहेत. तीन प्रभागात एकूण सात सदस्य आहे. गावचे नागरिक सहसा राजकारणापासून अलिप्त आहेत. एका अर्थाने बिनभानगडीचे हे गाव आहे.
सुमनबाई माने. परंडा तालुक्यातील कपिलापुरी गावच्या त्या रहिवासी. कपिलापुरी ग्रामपंचायतचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्थापनेपासून एक अपवाद वगळता कायम बिनविरोध निवडून दिली जाणारी पंचायत आहे. यंदाची निवडणूक जाहीर झाली आणि सुमनबाई माने या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तत्परतेने परंडा तहसीलमध्ये दाखल झाल्या. त्यांनी ओबीसी महिला आरक्षित प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामपंचायतीला 'बिनविरोध'ची परंपरा
कपिलापुरी ही लहान वामपंचायत असून खर्चाला फाटा देऊन निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी कायमच प्रयत्न केले जातात. यंदाही शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारपर्यंत सात जागांसाठी सातच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे याही वर्षी बिनविरोध निवडणूक निघावी, यासाठी जैन संघटनेचे अध्यक्ष राजकुमार जैन, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी सरपंच मोहन अवाने, शिवाजी माने प्रयत्न करीत आहेत.
संबंधित बातम्या :
- Gram Panchayat Election : सरपंचपदाचा लिलाव करताय, मग थांबा! सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश
- ग्रामपंचायत निवडणूक : उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसूर गावात 19 पैकी 17 अर्ज बाद, उच्च न्यायालयात धाव
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर... उमेदवारांना मजेशीर चिन्हं!